२५.५.२०१७ परत येऊन स्थिरथावर झाल्यानंतर पत्र (३)
ॐ
व.ग.काणे
एल बी.7,लक्ष्मीनगर,
पाण्याच्या टाकीजवळ, नाागपूर - 440 022.
दूरध्वनी/फॅक्स (0712)2221689 9422804430
चि अजू आणि नीलम यास
नागपूरला येऊन आता पुरेसे स्थिरथावर झाल्यानंतर हे पत्र लिहीत आहे. क्लीव्हलंड ते नेवार्क अणि पुढे नेवार्क ते मुंबई हा प्रवास काहीही विशेष न घडता सुखरूप पार पडला. मुंबईला पोटातले पाणी थोडेफार हलले एवढेच पण मुंबई ते नागपूर हा प्रवासही ठीकच झाला. विमानतळावर चि शैलेश व संगीता आले होते. गाडीने घरी आलो येतानाच अपण हिंदुस्थानात आणि तेही नागपूरला आल्याचे जाणवले. पाच-पन्नास वेळा तरी हॉर्न वाजवावा लागला असावा.
जेट लॅगचा त्रास झाला नाही. मी तर लगेच 19 तारखेला म्हणकजे तिसर्याच दिवशी मुंबईला गेलो.आईलाही त्रास झाला नाही.
आमची अमेरिकेची वारी इतकी सहज आणि सुखावह झाली याचे फारमोठे श्रेय तुम्ही दोघांनी केलेल्या नियोजनाला जाते. यात थोडाही फरक झाला असता तर इतका विनासायास प्रवास होऊ शकला नसता.अगदी लहानसहान बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन केले होते. माझ्या स्वभावाला अनुसरून मी पदोपदी शंका व प्रश्न उपस्थित करीत होतो. त्या सवर्संचे किंचितही न कंटाळता तुम्ही निरसन केले. या वेळी तुम्हाला राग आला असता किंवा तुम्हाला कंटाळा आला असता तर याचा दोष तुम्हाला देता आला नसता. पण तुम्ही दोघांनी अगदी शांतपणे , विश्वासाने आम्हाला आश्वस्त केले. या बद्दल तुम्हा दोघांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मुद्देसूद व काटेकोर नियोजनाचा एक उत्तम आदर्शच या निमित्ताने पहायला मिळतो.
तिथे अमेरिकेत आल्यानंतर आमची राहण्याचीच नव्हे तर खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी तुम्हादोघांची धडपड आम्ही पहात होतो. एवढा बासमती तांदूळ आम्ही आजवर खाल्ला नसेल आणि भविष्यातही खाण्याची शक्यता नाही. तीच गोष्ट ब्रेडबटरची म्हणायला हवी. निरनिराळ्या अमेरिकन रेसीपींसोबत आपले पदार्थही तयार होत होते.
या मुक्कामात मी डाएटिंग व व्यायाम करण्याचे ठरविले होते. हा हेतूही साध्य झाला पण त्याचबरोबर जिभेचे चोचलेही पुरविले जात होते. ईमेल करायला मी नव्याने शिकलो. तोच प्रकार स्कॅनिंगच्या बाबतीत होता. इंटरनेटवर तरूणभारत वाचता आल्याने नागपूरशी संपर्क कायम राहिला. नागपूरकरांच्या अगोदर मी तिथे तरूणभारत वाचत होतो. तरूणभारतात माझे चार लेखही प्रसिद्ध होऊ शकले. इमेलच्या साह्याने व फोनवरून सर्वांशी संपर्क करता येत होता. यामुळे तिथे रुळायला खूपच मदत झाली.
इरी टाईम्समुळे अमेरिकेतील सामाजिक,राजकीय आणि विशेषत: शैक्षणिक घडामोडी समजू शकला. तिथल्या शाळेची माहिती व प्राचार्यांशी भेट ही तर या सर्वावरची कडीच म्हटली पाहिजे. विशेष कौतुक याचे की आपल्या सासर्याचा वीक पॉईंट लक्षात ठेवून नीलमने स्त:हूनच पूर्वतयारी करून ठेवली होती.
इरी शहरात नीलमने एकटीने फेरफटके मारून आणले. तिचे कार चालवण्याचे कौशल्य वाखाणण्यासारखेच आहे. रथाचा भार दोन्ही चाकांवर सारखाच असतो असे म्हणतात. याचे प्रत्यक्ष रूप नीलमचे कार्यकर्तृत्त्व व कौशल्य पाहून अनुभवाला आले. घर, मुले, सासूसासरे, दैनंदिन व्यवहार ,बाजारहाट, दुखणेखुपणे काढणे याहीपेक्षा लांबलचक यादी होईल. आपली प्रकृती सांभाळून तीही ही सर्व कामे मुळीही न कंटाळता अगदी सहजपणे हाताळत होती.
अमेरिकेतील सफरी तुम्हा दोघांच्या तपशीलवार नियोजनामुळे व्यवस्थितपणे व अगदी सुरळीत स्वरूपात पार पडल्या. केवळ येणेजाणेच नव्हे तर प्रेक्षणीय स्थळांची निवडही तुम्ही अगदी चोखंदळपणे केली होती. त्यामुळेच अमेरिकेचे प्रातिनिधिक स्वरूप पाहता, निरखता आणि अनुभवता आले. अमुकएक प्रकारचा अनुभव घ्यायचा राहिला असे झाले नाही.
अजू आपल्या कामात व्यस्त, ओम्कार आपल्या शाळेत व मित्रांमध्ये रुळलेला, अनुषाला सगळेच नवीन त्यामुळे ती हळूहळू रुळू लागली होती. समज नसतांना कराव्या लागलेल्या स्थित्यंतरांमुळे तिला गोंधळल्यासारखे, बावरल्यासरखे, बावचळल्यासारखे झाले असणार. ते तिला धडपणे सांगताही येत नसणार. पण त्यातून तुम्ही तिला व्यवस्थितपणे बाहेर काढीत होतात. नीलमने स्वत:ला नवीन वातावरणात जाणीवपूर्वक रुळवून घेतले असणार. परदेशात परधर्मी मैत्रिणी मिळवल्या एवढेच नव्हे तर त्यांच्याशी जिवलग मैत्रीही केली. असे उदाहरण क्वचितच पहायला मिळते.
व्यावसायिक प्रश्नांमुळे तुमच्या मनात अस्वस्थता असणे अगदी स्वाभावीकच म्हटले पाहिजे. पण त्याचा मागमूसही तुम्ही दोघांनी लागू दिला नाही. हे सर्व प्रश्न यथावकाश सुरळीतपणे सुटतील यात शंका नाही. पण दरम्यानच्या काळात व्यक्तीच्या धीराची, संयमाची, शांतपणाची परीक्षा होत असते. या परीक्षेत तुम्ही उत्तमरीत्या उत्तीर्ण झालात. आम्ही दोघे तिथे ’होमसिक’ होत होतो पण तुम्ही स्वत:ला हा त्रास होऊ दिला नाही. इतर लोक आणि तुम्ही दोघे यांच्यामधले हे व्यवच्छेदक लक्षण म्हटले पाहिजे.
रत्नागिरी, बंगलोर आणि आता इरी अशा तीन ठिकाणी आम्ही तुमच्याकडे मुक्कामाला होतो. प्रत्येक वेळी काहीना काही नवीन शिकत होतो, अनुभवत होतो. पण ही भेट तर सर्वावर कडी करणारी ठरली आणि धन्यता वाटली. खरे तर याहीपेक्षा पुष्कळ काही लिहिण्यासारखे आहे. पण ते सांगायला शब्द अपुरे पडतात. हा भाग न बोलता, सांगता अनुभवायचा समजून घ्यायचा असतो. तो तुम्हीही आमच्याप्रमाणे समजून घ्याल अशी खात्री आहे. म्हणून येथेच थांबतो.
बाबा,आई

No comments:
Post a Comment