२५.५.२०१७ प्रवास (२) इरीच्या संग्रहालयात शिवाची मूर्ती !
निम्मी पृथ्वी प्रदक्षिणा करून अमेरिकेत आलेल्या नेपाळी हिंदु बांधवांना सुखद धक्का देणारे शीर्षक ’इरी टाईम्स’ मध्ये वाचले आणि तशीच प्रदक्षिणा करून आलेल्या आम्हा प्रवाशांनाही आनंद झाला . ही पहिली बातमी वाचली आणि ‘प्रथमग्रासे अति मधुर आस्वाद ’अनुभवाला यावा तसे झाले . हा असाच अनुभव सतत तीन महिने आम्हाला येत राहिला.
अमेरिकेतील पिेन्सलव्हॅनिया प्रांतातील इरी सरोवाराकाठी वसलेल्या त्याच नावाच्या गावी आम्ही सोळा जूनला येऊन पोचल्यानंतर भारताचा जरी नव्हे तरी नेपाळचा उल्लेख वृत्तपत्रात आलेला पाहून आपण हिंदुस्थानातच आहोत, असे क्षणभर वाटून गेले . नेपाळातून इतक्या दूर अमेरिकेत नेपाळी निर्वासित आल्याचे वाचून आश्चर्यही वाटले . वीस जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून पाळला जातो, हेही तेव्हाच कळले .
देवी सुबेदी आणि नंदू सुबेदी हे दोघे आपली आई पद्मा आणि आणखी वीस कुटुंबीयांसह इरीला आले आहेत . याशिवाय हिंदु असल्यामुळे ज्यांना भूतान मधून निर्वासित होऊन यावे लागले, असे एकशे पंचाहत्तर लोकही इरीतच आहेत . हे लोक येथे मोलमजुरी करून आपले पोट भरीत आहेत .
बातमी अशी होती . इरी येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटच्या समन्वयक श्रीमती केटी व्हाईट यांनी जागतिक निर्वासित दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता . या निर्वासितांनी आपल्यासोबत आणलेला ’संपन्न सांस्कतिक वारसा आणि विविधता’ यामुळे ’नवनवीन कल्पना आणि जोम’अमेरिकन समाजालाही चैतन्य प्राप्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. निर्वासितांचा (त्यातही हिंदू निर्वासितांचा) अशा शब्दात गौरव केलेला प्रथमच ऐकत होतो. नंतर कळले की जगातल्या कोणत्याही निर्वासिताला आश्रय देण्याचे अमेरिकेचे धोरण आहे .
निर्वासितांची परवड
1980 साली जवळजवळ चारशे वर्षांपासून भूतानमध्ये राहणार्या नेपाळी हिंदूंना निर्वासित व्हावे लागले . आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास त्यांना प्रतिबंध करण्यात आला होता . नेपाळ सीमेलगतच्या छावण्यात हे निर्वासित राहत होते . एके रात्री पेटता दिवा कलंडून भडकलेल्या आगीत अ‘खी छावणी भस्मसात झाली. बेघर झालेले हे निर्वासित अखेर अमेरिकेत आश्रयाला आले आणि दोन आठवड्यानंतर पेन्सिलव्हॅनिया प्रांतातील इरी या शहरात ’स्थायिक’ झाले .
’हिंदु मंदीर बांधायचे आहे’, एक प्रमुख स्वप्न
मोलमजुरी करून कालक‘मणा करणार्या या पावणे दोनशे हिंदूंनी एक स्वप्न उराशी बाळगले आहे . त्यांना एक हिंदु देवालय बांधायचे आहे . इरीला एक आंतरराष्ट्रीय संग्रहालय आहे . या ठिकाणी या हिंदूंना ’इंग्रजीचे धडे’ देण्यात येत असतात . एक दिवस ही मंडळी ग्रंथालयात फेरफटका मारीत असतांना त्यांना ब्राॅंझ धातूची शिवाची मूर्ती दिसली . ’सातासमुद्रापलीकडे आपल्या देवाला’ पाहून हे हिंदुबांधव आश्चर्यचकित आणि आनंदित झाले . त्यांना आपण ’आपल्याच घरी आल्याचा’ आनंद ही शिवाची मूर्ती पाहून झाला त्यामुळे अमेरिकेत पोचलेल्या आपल्या शिवाला पाहून मंदीर बांधण्याच्या त्यांच्या स्वप्नाला नवीन उभारी आली आहे .
या लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळेल किंवा नाही, ते सांगता येणार नाही . पण यांची अमेरिकेत जन्मलेली मुले अमेरिकेचे नागरीक ठरतील . कारण ज्याचा जन्म अमेरिकेत झाला, तो अमेरिकेचा नागरिक ठरतो, अशी अमेरिकेच्या घटनेत तरतूद आहे .
अमेरिकेतही मतदान कमी झाले
भारतात लोकसभेची निवडणूक पार पडली आणि मतदानाची टक्केवारी कमी झाली म्हणून चिंता व्यक्त होऊ लागली . कोणाचे, कोणते व किती मतदार मतदानाला गेले नाहीत , याची चर्चा आपल्या देशात होत आहे .
गेल्या अनेक वर्षात अमेरिकेत जे घडले नाही ते नोव्हेंबर 2008 च्या निवडणुकीत घडले , याची चर्चा येथील वर्तमानपत्रात सुरू आहे . मतदानाची टक्केवारी कमी होण्याची टक्केवारी कमी का झाली याचा शोध घेणे सुरू आहे .
अमेरिकेत मतदान कमी का झाले ?
बरॅक ओबामा आणि जॉन मॅकेन हे दोन्ही उमेदवार नापसंत असल्यामुळे अनेक प्रौढ गोरे मतदार मतदानाला गेले नाहीत . त्यांनी घरी राहणेच पसंत केले , असे एका पाहणीत आढळून आले आहे . नोव्हेंबर 2008 च्या निवडणुकीत अमेरिकेत 63.6 (त्रेसष्ट दशांश सहा ) टक्के मतदारांनी मतदान केले . 2004 साली झालेल्या निवडणुकीत 63.8 (त्रेसष्ट दशांश आठ ) टक्के मतदान झाले होते . याचा अर्थ असा की, मतदानाची टक्केवारी 0.2 टक्क्यांनी घटली. आपल्या येथील टक्केवारीची घसरण पाहता दोन दशांश टक्क्यांची घसरण फारशी मोठी वाटत नाही .पण या घसरणीचाही शोध घेणे येथे सुरू झाले आहे.
मतदान करणार्यांची संख्या वाढली पण टक्केवारी घसरली
तसे पाहिले तर 2009 च्या निवडणुकीत मतदान करणार्याच्या मतदारांची एकूण संख्या 2004 मध्ये मतदान करणार्यांच्या संख्येपेक्षा काही लाखांनी वाढली आहे . पण टक्केवारी मात्र कमी झाली आहे . मतदारांच्या संख्येत झालेली वाढ अल्पसंख्यांकांमुळे झाली आहे , असेही आढळून आले आहे .
गोरे मतदार उदासीनतेत पुढे आहेत .
मतदान करणार्या ’गोर्या’ मतदारांची संख्या एका टक्क्याने घटून 66 (सहासष्ट) टक्के झाली , तर काळ्यांची संख्या पाच टक्क्यांनी वाढून 65 (पासष्ट ) टक्के इतकी झाली . अशाप्रकारे ’काळे’ टक्केवारीत ’गोर्यांच्या’ जवळजवळ बरोबरीत आले आहेत . आशियन मतदारांची टक्केवारी साडे तीन टक्क्यांनी वाढली आहे . इतरांच्या टक्केवारीतही तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे . आता दर चार मतदारांपैकी एक मतदार अल्पसंख्यांकांमधला असतो . ’गोर्यांच्या’ टक्केवारीतील घसरण विशेषत: आहिओ आणि पेन्सिलव्हॅनिया या दोन राज्यात दिसून आली . या घसरणीचा ओबामा यांना विशेष फायदा झाला , असे मानले जाते .
अल्पसंख्यांकांची मते निर्णायक ठरणार ?
अल्पसंख्यांकांनी आपली मते ओबामा यांच्या पारड्यात बहुसंख्येने टाकली आणि त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला, हे जसे खरे आहे, तसेच रिपब्लिकन उमेदवार मॅकेन यांना मतदान करण्यावचे बाबतीत गोरे मतदार उदासीन राहिले, ही बाबही महत्त्वाची मानली जाते . अमेरिकेतील अनेक राज्ये आता पूर्वीसारखी गोरी राहिली नसून ती हळूहळू संमिश्र(पर्पल) होऊ लागली आहेत , असेही आढळून आले आहे .
ब्रुकलिंग्ज इन्स्टिट्यूशनचे लोकसंख्या तज्ज्ञ विल्यम फ्रे यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला असून यानंतर येणार्या निवडणुकींमध्ये खरी लढाई कोणत्या राज्यात घडून येईल, याबाबतचे भाकीतही वर्तवले आहे .
तरुणांच्या मतदानात वाढ का झाली ?
अठरा ते चोवीस वयोगटातील मतदारांच्या मतदानात या निवडणुकीत विशेष वाढ झाल्याचे दिसून आले आहे . अमेरिकेला सध्या मंदीने ग्रासले आहे . या पार्श्वभूमीवर ’तरुणांचा मतदानातील उत्साह’ लक्ष वेधून घेतो आहे . या मतदारांच्या अपेक्षा नवीन राजवट किती प्रमाणात पूर्ण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
हिंदुस्थान आणि अमेरिकेत मतदान घटण्याची कारणे सारखीच
मतदान न करण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्नही या निमित्ताने करण्यात आला . ’गोर्या’ मतदारांपैकी शेहेचाळीस टक्के मतदारांनी पुढीलप्रमाणे उत्तरे दिली आहेत .
1. आम्हाला उमेदवार पसंत नव्हते .
2. आम्हाला निवडणुकीत ’रस’ नव्हता .
3. इतर कामे आम्हाला अधिक महत्त्वाची वाटली , म्हणून आम्ही मतदान केले नाही .
अशीच पाहणी 2004 मध्येही करण्यात आली होती . अशा उदासीन मतदारांच्या टक्केवारीत पाच टक्क्याने वाढ झाली असून ही बाब चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे .
लोकशाहीवरचा विश्वास कसा वाढेल ?
भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे . अमेरिका हा जगातील एक प्रमुख लोकशाहीप्रधान देश आहे . या दोन्ही देशात मतदार मतदान प्रक्रियेपासून दूर जात आहेत . भारताइतकी उदासीनता अमेरिकेत नाही . पण लोकशाहीपासून मतदार दूर जाणे थांबले आणि थोपविले गेलेच पाहिजे. रशियातच साम्यवादाचा पराभव झाला . तिथे लोकशाही मूळ धरू लागली आहे . लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर ते हुकुमशाहीला निमंत्रण ठरेल . या बाबीची चाहूल लागताच अमेरिका सावध झाली आहे . ’केवळ दोन प्रमुख पक्षांनीच नव्हे तर सर्व राजकीय पक्षांनी सावध होण्याची आवश्यकता आहे . उमेदवारांची आणि राजकीय पक्षांची विश्वासार्हता कायम राहिली पाहिजे . ही जबाबदारी प्रामुख्याने राजकीय पक्षांची असली तरी सुजाण व जागरूक नागरिक आणि प्रसार माध्यमे यांनी सुद्धा आपला वाटा उचलला पाहिजे . आता जगात नवीन हुकुमशहा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यातच मानवजातीचे कल्याण आहे’, हा मजकूर आपल्या देशातील वर्तमानपत्रातला वाटेल पण तसे नाही, हाच विचार अमेरिकेतही व्यक्त होत आहे

No comments:
Post a Comment