२६.५.२०१७ प्रवास अमेरिकेतील किल्लारी गाव (९)
हर्षे चाकोलेट फॅक्टरीला भेट दिल्यानंतर आमची ताशी सत्तर मैल या नेहमीच्या गतीने अमेरिकेतील किल्लारी गावाच्या दिशेने रवाना झाली. मराठवाड्यातील किल्लारी गाव भूकंपामुळे अचानक जमीनदोस्त झाले होते. अमेरिकेतील सेंट्रालिया हे गाव एका कोळशाच्या खाणीवर वसले होते . खाणीतून कोळसा निघत होता. एक दिवस अख्खी खाणच पेटली . सगळे गाव आगीच्या भक्षस्थानी पडले . अनेक माणसे मेली . गाव आणि खाण दोन्ही उजाड झाले आहे . कोळसा वाहून नेणार्या वाघिणी, रेल्वेचे रूळ, तारांचे खांब आता तिथेच पडून आहेत . या प्रकोपातून वाचलेल्यांचे पुनर्वसन झाले . या गोष्टीला तीस वर्षे लोटली . पण या ठिकाणी अजूनही जमिनीतून जागोजागी धूर निघत असतो . अर्धवट जळलेली घरे, उखडलेले रस्ते, लोकांच्या चीजवस्तूंचे अवशेष या सर्व गोष्टी नैसर्गिक संकटाच्या भयानक तांडवाचे साक्षीदार म्हणून आजही नजर जाईल तिथे दिसून येतात. या ओसाडवाडीत आजही काही लोक मात्र ठाण मांडून आहेत. ते इथे तसेच राहत आहेत. धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत, ते इथे का राहत असावेत ? आपले घर सोडवत नाही म्हणून ? बहाद्दुरी म्हणून ? की नाइलाज म्हणून ?
यालाच का जीवन ऐसे नाव ?
आम्ही गाडीतून खाली उतरलो . एका टेकाडावर चढलो . फोटो घेऊन धुराला ’प्रकाशबद्ध’ केले . धुराचेच फोटो ते ! ते चांगले कसे येणार ? पण नाही . ते फोटो छान आले आहेत . काय मजा आहे पहा ! एक चिमुकली सृष्टी इथे भस्मसात झाली . तीस वर्षे होऊन गेली तरी जमिनीतून धूर येतोच आहे . पण येणारे जाणारे ’हा धूर आपल्याला आपल्या कॅमेरात पकडून गावी नेता येईल किंवा नाही’ याच फिकरीत ! यालाच का जीवन ऐसे नाव आहे ?
पेन्स व्हॅली
रात्री आम्ही ब्लूमबर्ग नावाच्या छोट्याशा गावी मुक्काम केला आणि 12 ऑगस्ट 2009 ला भल्या पहाटे उठून पुढच्या प्रवासाला निघालो. पेन्सिलव्हॅनिया प्रांतात अॅरोन्सबर्ग येथे पेन्स व्हॅली (दरी) आहे . या दरीत एक गुहा असून तिला ’पेन्स केव्ह’ असे नाव आहे . जवळजवळ साडे बारा हजार वर्षांपूर्वी ही गुहा तयार झाली असावी, असे मानतात . संपूर्ण गुहा पाण्याने भरलेली असून एक छोटीशी नाव जाऊ शकेल एवढीच रुंद आहे . गुहेची उंची मात्र ठिकठिकाणी बदलती असून काही ठिकाणी तर ती शंभर फूट इतकी उंच आहे . तर काही ठिकाणी डोके आपटून कपाळमोक्ष होऊ नये म्हणून मानेत खाली वाकावे लागावे इतकी, म्हणजे पाण्याच्या पातळीपासून जेमतेम पाच/सहा फूट, इतकीच उंच आहे . वरचा खडक सच्छिद्र असून त्यातून सतत पाणी ठिपकत असते . पाण्याचे काही थेंब खाली न पडता वरच्यावरच सुकतात . याउलट काही खाली पडून मग सुकतात. हा खडक चुनखडी या प्रकारचा आहे . त्यामुळे पाण्याचा थेंब खाली न पडता वरच सुकला तर तिथे वरच थर तयार होतो . तो खालीपडून मग सुकला तर खालीही थर तयार होतो . यामुळे काही ठिकाणी वरून खाली लोंबकळणार्या आकृत्या तयार होतात तर काही ठिकाणी खालून वर उभ्या राहणार्या आकृत्या तयार होतात .
स्टॅलेक्टाईट्स आणि स्टॅलेग्माईट्स
वरून खाली वाढणार्या या रचनांना स्टॅलेक्टाईट्स असे नाव आहे तर खाली थेंब पडून तिथे तयार होणार्या रचनेला स्टॅलेग्माईट्स असे शास्त्रीय नाव आहे . आम्ही 1950 साली इंटर सायन्स ला रसायनशास्त्र शिकतांना ऐकलेली ही नावे आठवली . ’टाईट्स गो डाऊन आणि माईट्स गो अप’, अशी पंक्ती आम्ही पाठ करीत असू . वरून खाली तयार होता ते टाईट्स(चड्डी) आणि खालून वर जातात ते माईट्स (शक्तिशाली), असा आमचा लक्षात ठेवण्याचा ’फंडा’ होता .
आपल्या येथील काश्मीरमधील अमरनाथ गुहेतील ’शिवलिंग’ असेच तयार होत असते . मध्यप्रदेशातील पचमढीला जटाशंकर नावाची एक गुहा असून तिथे पाणी सुकून जमा होणार्या आकृत्या शंकराच्या जटांसारख्या दिसतात म्हणून त्यांना ’जटाशंकर’ असे नाव आहे .
आम्ही नावेत बसून या गुहेतील जवळजवळ एक मैलाचा परिसर पालथा घातला . नाव सुटते त्या ठिकाणी जायचे म्हणजे बरेच खाली जावे लागते , म्हणून सौ पुष्पा बाहेरच थांबली होती . अनुषाला अंधाराची भीती वाटत होती म्हणून नीलमलाही बाहेरच थांबावे लागले . अंधार्या खोल दरीत ठिकठिकाणी प्रकाशव्यवस्था होती . नावाडी त्या त्या थांब्यावर आला की बटने ’ऑन’ करून तो भाग प्रकाशित करीत होता आणि पुढे जाताना ते ’ऑफ’ करून अंधाराला पुन्हा जागा करून देत होता .
डेव्ह इन ए केव्ह
आमच्या नावाड्याचे नाव डेव्ह असे होते .’डेव्ह इन ए केव्ह ’ म्हणून असे म्हणून त्याने साखळी ओढून डिझेलवर चालणार्या नावेच्या इंजिनात प्राण फुंकला आणि नाव थरथरू लागली . डेव्ह गमत्या आणि हजारजबाबी होता. त्याची बडबड सतत चालू होती . विनोदांची पखरण करीत एकेक विशेष तो आमच्या मनावर बिंबवीत होता. वरून खाली येणार्या ’टाईट्सनी’ आणि खालून वर जाणार्या ’माईट्सनी’ निरनिराळे आकार धारण केले होते . त्यात कधी लिबर्टीच्या पुतळ्याचा भास होत होता तर कधी महाकाय मगर ’दिसत’ होती . ’हा पहा बुद्ध’, असे म्हणून त्याने जीभ चावली आणि दुरुस्ती केली, ’हा पहा गणेश’. बुद्ध आणि गणेश त्याच्या हिशोबी सारखेच होते.
डेव्हचे विनोदी किस्से
डेव्ह अनेक वर्षे इथे काम करतो आहे .’ माझे वडीलही इथेच काम करायचे . मी सांगतो आहे त्यातले काही विनोद माझ्या वडलांनी रचले आहेत तर काही मी रचले आहेत . त्यातले जे चांगले आहेत , ते मी रचले आहेत, बरं का ?’, असे म्हणत त्याने आमच्या सफरीला प्रारंभ केला .
’छताची उंची आता कमी होत आहे, त्यामुळे वेळीच वाकून ज्याने त्याने आपले डोके सांभाळावे’ .
’येथे पाण्याची खोली जेमतेम तीन फूट आहे . त्यामुळे दुर्दैवाने नाव उलटली आणि बुडू लागलात तर खाली पाय टेकून उभे रहा.’
येथे अशा तीन/चार बोटी आणि ’डेव्ह’ आहेत . सगळ्यांच्या बोटींचे केवळ थांबेच नव्हेत तर विनोदही ठरलेले आणि ’तेच ते’ असतात. (आमच्या सोबत काही दुसर्यांदा सफर करणारेही होते .) एकच ’स्कि‘प्ट’ सगळे ऐकवत असतात. हळूहळू आमची बोट गुहेतून बाहेर उघड्यावर आली. डोक्यावर स्वच्छ आकाश दिसत होते. आता बोटीने परतीची वाट धरली . काठा-वरच्या लोकांना ’हाय, हॅलो’ करीत आम्ही पुन्हा गुहेत शिरलो . आरंभस्थान केव्हा आले ते कळलेच नाही .
’नावेतून उतरतांना प्रत्येकाने आपली चीजवस्तू सोबत घेऊन जाण्याची आठवण ठेवावी. मुलाबाळांनाही विसरू नये,’ असा प्रेमाचा सल्ला देऊन डेव्हने आमचा निरोप घेतला आणि एकेवीस जणांच्या नव्या गटाला नावेत बसविण्यासाठी तो नवीन उत्साहाने सज्ज झाला .

No comments:
Post a Comment