२६.५.२०१७ सहल न्यूयॉर्क (१२)
आमची न्यूयॉर्कची सहल मुळात 4,5,6,7, ऑगस्ट अशी ठरली होती. पण शुक्रवारी 4 तारखेला अजितच्या हेवी ड्युटीमुळे निघता आले नाही. म्हणून शनिवारी सकाळी सात वाजता निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल होते, पलीकडे सूर्य उगवला होता पण झाडांमुळे सूर्यकिरणे पोचू शकत नव्हती. सकाळी रस्ता धुक्याने पूर्णपणे झाकला गेला होता. कारचे दिवे निष्प्रभ झाले होते. हळूहळू सूर्य वर आला आणि धुकेही तसेच हळूहळू विरले आणि दुपारी तीन साडे तीन वाजता न्यू जर्सीची राजधानी ट्रेन्टनला 24 बंकर ड्राईव्ह येथे मिलिंद दातार (पत्नीचे ज्येष्ठ बंधू कै मधुकर व त्यांच्या पत्नी श्रीमती अलका दातार यांचे चिरंजीव) यांच्या घरी पोचलो.
सर्व काही घरच्या घरी
मिलिंद आणि त्यांची पत्नी सुगंधा गांधीलमाशा माशा मारीत होते. गांधीलमाशांनी प्रसाद दिला होता, म्हणून ती दोघे एकेक माशी शोधून तिला गारद करण्यासाठी कीटकनाशकाचा स्प्रे फवारत होते. अमेरिकेत मजूर, घरगडी, नोकर मिळतच नाहीत, असे म्हटले तरी चालेल. सगळी कामे घरच्याघरी ज्याची त्यालाच करावी लागतात. झाडझूड, धुणीभांडी यांच्यासाठी दिमतीला मशीने आहेत.पण ती चालवणे, हाताळणे हेही एक कामच असते. त्यामुळे घरात दोघे मिळून किंवा एकेकट्याने इथले लोक ही कामे करीत असतात. याला पर्याय नसतो.
आठचा पाढा
हे जाऊ द्या. पण छोटीमोठी दुरुस्तीची कामे, सुतारकामे, जोडकामे घरीच केली जातात. बाजारात सुटे भाग भरून पॅक करून ठेवलेली खोकी मिळतात. टेबल, खुर्ची, स्टूल अशी कोणतीही वस्तू तयार करायची असेल तर हव्या त्या आकाराचे तुकडे असलेली खोकी आणता येतात. ते विकत घरी आणायचे आणि घरच्याघरी टेबल, खुर्ची, आलमारी, रॅक अशा वस्तू तयार करायच्या. यासाठी अमेरिकेत एक महत्त्वाचा फंडा सर्वांनी स्वीकारला आहे. तो म्हणजे आठचा पाढा ! केवळसुट्या भागांचेच नव्हे तर प्रत्येक वस्तूचे लांबी रुंदीचे माप आठ इंच किंवा त्याच्या पटीतच असेल. खिडक्यांची, दारांची लांबी रुंदी सुद्धा आठच्या पटीतच असली पाहिजे. याचा फायदा असा होतो की सुटे भाग फार मोठ्या प्रमाणात एकदम तयार करता येतात. आणि त्या त्या वस्तूंचे सुटे भाग असलेले खोके बाजारातून आणून ती वस्तू तयार करता येते. थोडासा मेकॅनोसारखा प्रकार आहे हा. सफेदीसकट सर्व कामेही अनेकजण घरच्या घरीच करतात.
मिलिंद दातार यांचे घर चांगले प्रशस्त आहे. एखादे फार्म हाऊसच म्हणाना. सभोवती झाडी जंगल आहे. हरणांचे अख्खे कुटुंब अधूनमधून अंगणात भेटीला येत असते.
त्या दिवशी मिलिंद आणि सुगंधा यांना गाण्याच्या कार्यक्रमाला जायचे होते. ऋषिकेश रानडे, विभावरी आपटे आणि त्यांचे सहकारी गाणार होते. ते कार्यक्रम आटोपून परत आले तोपर्यंत आमची जेवणे आटोपली होती. सौ पुष्पाची मोठी वहिनी अलका दातार (मिलिंदची आई) आणि त्यांची नातवंडे मेघना आणि यश आमचा समाचार घेत होते.
अमेरिकेतल्या लोकल्स अशा धावतात.
रविवारी आम्हाला सकाळी निघायलाच उशीर झाला. आम्ही प्रिन्स्टन स्टेशनवर गाडी ठेवली आणि लोकल पकडली. एटीएम सारख्या मशीनमधून तिकीटे मिळतात. प्लॅटफॉर्मवर आलो. थोड्याच वेळात लोकल आली. ती एकच मिनीट थांबणार होती. चढायउतरायला एक मिनीट पुरेसे वाटले. आमच्याबरोबर अनुषा होती. तिच्या स्ट्रोलरसह (ढकलगाडी) आम्ही जागेवर जाऊन बसलो. ओम्कारने न्यूयॉर्क पाहिले होते. यश बरोबर खेळायला मिळावे म्हणून तो घरीच थांबला होता.
कंडक्टर/तिकीट चेकर आला. त्याला आम्ही तिकिटे दिली. ती त्याने ठेवून घेतली. आपला एस टी चा कंडक्टर देतो तसले तिकीट त्याने पंच करून आमच्या प्रत्येकाच्या खुर्चीला सहज दिसेल असे लावून ठेवले. दुसर्या स्टेशनवर इतर उतारू चढले. त्यांची तिकिटे त्यांने पंच केली. आमच्याकडे तो फिरकला नाही कारण आमच्या खुर्चीला लावलेले तिकीट त्याला दिसत होते. शेवटचे स्टेशन आले आणि उतारू उतरू लागले कंडक्टर पुन्हा आला आणि खुर्चीला लावलेली तिकीटे त्याने काढून घेतली आणि ती खुर्ची दुसर्या उतारूला बसण्यासाठी मोकळी करून ठेवली आणि त्यांच्या स्वागतासाठी तो सज्ज झाला. शेवटी न्यूयॉर्क स्टेशन आले आणि आम्ही बाहेर आलो.
असे आहे न्यूयॉर्क शहर
न्यूयॉर्क शहर . वॉशिंगटन ही अमेरिकेची राजधानी,हे खरे. पण न्यूयॉर्कचे वैशिष्ट्य काही वेगळेच आहे. व्यापार, अर्थकारण, कला, फॅशन, संशोधन, आंतरराष्ट्रीय राजकारण यांचे केंद्र असलेले न्यूयॉर्क हे नैसर्गिक बंदरही आहे. या शहरात जवळजवळ आठशे भाषा बोलल्या जातात. स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा, टाईम्स स्वेअर ब्राॅडवे थिएटर, स्टॉक एक्सचेंजचे सर्वात मोठे केंद्र, आजच्या जगाची आर्थिक राजधानी(जशी मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी),अति विस्तीर्ण पार्क्स/बगीचे (नॅशनल पार्कची लांबी रुंदी मैलात मोजावी लागते), अनेक लांबचलांब उड्डाण पूल, गगनचुंबी आणि निमुळत्या छताच्या टोलेजंग इमारती, अनेक महाविद्यालये, कोलंबिया, न्यूयॉर्क, रॉकफेलर यासारखी जागतिक कीर्ती आणि प्रतिष्ठा असलेली आणि पहिल्या पन्नासात येणारी विद्यापीठे, न्यूयॉर्क सिटी सबवे सारखी अव्दितीय वाहतुक व्यवस्था अशा नानाविध वैशिष्ट्यांनी नटलेले न्यूयॉर्क शहर हे एकमेवाव्दितीय जागतिक कीर्तीचे शहर आहे. मात्र ते एकेकाळी गुलामगिरीचेही मोठे केंद्र होते. त्याकाळी या शहरातील लोंख्येपैकी बेचाळीस टक्के लोक (म्हणजे जवळजवळ निम्मे लोक) गुलाम होते. जगातील सर्वात मोठा अतिरेकी हल्ला 11 सप्टेंबर 2001 ला न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झाला. याचे कारणही या शहराचे हे मोठेपणच होते.
इथले हवामान तसे दमटच म्हटले पाहिजे. हिवाळ्यात मात्र भरपूर थंडी असते. अख्खी हडसन नदीसुद्धा गोठते. पण दैनंदिन व्यवहार क्वचितच गोठतात. हा संपूर्ण भाग पृथ्वीच्या उत्तर भागात आहे. त्यामुळे इथल्या उन्हाचे चटके आपल्यासारख्या उष्ण हवामानाच्या देशातून येणार्यांना सुद्धा जाणवतात. न्यूयॉर्कमध्ये काय नाही ? सर्वकाही आहे.
सजीव निवेदन
आम्ही ग्रेलाईन बस कंपनीच्या ’हॉप ऑन हॉप ऑफ’ तिकीट काढले होते. दुमजली बसच्या उघड्या डेकवर बसून आम्ही न्यूयॉर्कला फेरफटका मारला. वॉशिंगटनला रेकॉर्डेड निवेदन होते. इथे मात्र निवेदक ध्वनिक्षेपक वापरून सजीव निवेदन (लाईव्ह) करीत होता.
प्रथम गाठ पडली ती 1853 मध्ये उभारलेल्या महिलांसाठींच्या तुरुंगाची. आपल्या बसमध्ये गुन्हेगार महिला नसेल, अशी आशा बाळगतो, असे म्हणून निवेदकाने खसखस पिकविली. जाहिरातीचा एक प्रकार म्हणून साबणाच्या फुग्यांच्या वर्षावातून आम्ही पुढे सरकलो. मॅनहॅटन ब्रिज, सिटी हॉल ह्या भव्य रचना पहात आम्ही पोचलो एका रस्त्यावर.
मोठ्यांच्या छोट्या पण तरीही मोठ्याच गोष्टी
या रस्त्याचे नाव होते पर्ल स्ट्रीट. पर्ल म्हणजे मोती. अनेक पर्ल शेल्स म्हणजे शिंपली समुद्राच्या लाटांबरोबर किनार्यावर वाहून येत. त्यावरून हे नाव पडले. 1882 साली टॉमस अल्वा एडिसनने हाच रस्ता विजेचे दिवे लावून प्रकाशित केला होता.1884 साली एडिसन इल्युमिनेटिंग कंपनीने या ठिकाणी पहिले पॉवर स्टेशन उभारले होते. हा डी सी करंट होता. एडिसनविषयीच्या ऐकलेल्या /वाचलेल्या आठवणी जाग्या झाल्या. प्रकाशासाठी विजेचा वापर करता येईल, हे दाखविणारा जाहीर कार्यक्रम एडिसनने एका थिएटरमध्ये आयोजित केला होता. त्यावेळच्या दिव्यातील फिलॅमेंट कार्बनच्या बारीक तंतूचे होते. तो दिवा स्टेजवर आणता आणता त्याच्या सहकार्याच्या हातून तो तंतू तुटला आणि फजिती होऊन प्रयोग रद्द करावा लागला होता. दुसर्यांदा हाच प्रयोग करण्याचे ठरले. तेव्हा अनेकांनी एडिसनला सल्ला दिला की, ’यावेळी ’त्या’ धांदरट सहकार्याचे भरवशावर न राहता प्रयोगाचे वेळी दुसर्या एखाद्याचे सहकार्य घ्या’. पण एडिसनने त्याच सहकार्याचे साह्य घेऊन यशस्वी प्रयोग करून वाहवा मिळवली होती.
असेच उदाहरण आहे बिल गेटस चे मायक्रोसाॅफ्ट या संगणक तयार करणार्या कंपनीच्या मालकाचे. विंडो 98च्या विमोचनाचा कार्यक‘म होता. ही माहिती एका चित्रपटगृहात भल्यामोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचा कार्यक्रम निमंत्रित प्रेक्षकांसमोर सुरू असताना पडद्यावर दिसणारी अक्षरे एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कार्यक्रमाचा ’फियास्को’ झाला. या नंतर वर्ष दीडवर्ष सगळे ’शांत’ होते. ही विंडो रचणारा इंजिनिअर जपानी होता. तो या प्रकारानंतर कुणालाच दिसला नाही. ’तो कंपनी सोडून गेला असावा, कदाचित हे अपयश सहन न होऊन त्याने आपल्या जीवाचे बरेवाईट करून घेतले असावे’, असे लोक बोलू लागले. बिल गेटसने वर्ष दीड वर्षानंतर पुन्हा विंडो विमोचनाचा कार्यक्रम आयोजित केला. तो यशस्वी झाल्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तेव्हा बिल गेटस सर्वांसमोर आला. विंगेत अंग चोरून उभ्या असलेल्या इंजिनिअरला त्याने बळेच हात धरून सर्वांसमोर आणले.
’ह्या टाळ्यांच्या कडकडाटावर खरा अधिकार पोचतो तो या माझ्या सहकार्याचा’अशा शब्दात बिल गेटसने ’त्या’जपानी इंजिनिअरचा परिचय करून दिला.’मागे झालेल्या त्या प्रकारानंतर त्याने स्वत:ला प्रयोगशाळेत कोंडून घेतले होते. जुन्या उणीवा शोधून काढल्या आणि नवीन रचना आखली. तिचेच यशस्वी प्रदर्शन आज आता आपल्यासमोर झाले आहे.’ हे ऐकल्यावर लोकांनी आणखी एकदा पण पूर्वीपेक्षा मोठा असा टाळ्यांचा कडकडाट केला.
तसे पाहिले तर या मोठ्यांच्या छोट्या गोष्टी आहेत. पण त्या नेहमीच्या मालक-नोकर संबंधापेक्षा वेगळे काहीतरी सांगून जातात.
बुल सोबतची बहाद्दर तरुणी
यानंतर गाठ पडली वॉल स्ट्रीट वरच्या दाणगट बुलच्या (सांडाची) पुतळ्याची. शेअर मार्केटच्या या बुलने सध्या अमेरिकेला अगदी जेरीस आणले आहे. देशभर मंदीचे सावट आहे. पण एक बहाद्दर तरुणी त्या बुलच्या गळ्यात गळा घालून ’पोजेस’ देत होती. तिच्या त्या ’पोजेस’ तिचा सहकारी कॅमेर्यात टिपत होता.
अमेरिकेत सध्या कर्मचार्यांची छाटणी होत आहे. अशा वेळी अनेक वयस्क व्यक्ती छाटणीसाठी स्वत: तयार होतात. ’आमचा संसार आटोपत आला आहे. आम्हाला घरी बसवा पण तरूण मंडळींना नोकरीवरून काढू नका’, अशा आशयाची विनंती ते व्यवस्थापनाला करीत असतात. मानवतेचे दर्शन केव्हा, कुठे आणि कसे होईल ते सांगता येत नाही, हेच खरे.
प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे दर्शन आम्ही दुरूनच घेतले. तिथे जाण्यासाठी ’मोफत सवारी’ साठी बोटींची व्यवस्था होती. त्यामुळे एक भलीमोठी रांग मुंगीच्या पावलांनी पुढे सरकताना पाहून आम्ही आमचा विचार बदलला. बसमधूनच स्टॅच्यूचे दर्शन घेतले आणि तसेच पुढे जाण्याचे ठरविले.
बॉडीज एक्झिबिशनमध्ये मानवी देहाचे निरनिराळे भाग दाखविले होते. कमी वेळ आणि सोबत लहान मुले यामुळे आम्ही पुढे निघालो.
ब्रुकल ब्रिज हा 1860 चा पूल आणि त्याला काटकोन करून जाणारा मॅनहॅटन ब्रिज असे दृश्य प्रथमच पहात होतो. अमेरिकेतील अनेक पूल गेली दोनशे वर्षे भरभक्कम स्थितीत उभे असलेले दिसतात. आपल्याकडेही असा प्रकार आढळतो पण तो असतो जुन्या किल्यांच्या बाबतीत. हे किल्ले बांधतांना चुनखडी तापवून त्यापासून कळीचा चुना मिळवत असत. हा चुना म्हणजे कॅलशियम ऑक्साईड किंवा बांधकामाचा चुना होय. यात रेती मिसळत, पाणी टाकीत, त्यामुळे कॅलशियम हैड्रॉक्साईड व रेती एकजीव करीत आणि ’जुडाई’ केली जाई. भट्टी नीट जमली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी किंवा जुडाईचे मिश्रण बरोबर साधले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी गवंडी लोक या चुन्याच्या मिश्रणाचे गोळे करून ते किल्याच्या भिंतीवर फेकून मारीत. तो गोळा भिंतीला चिकटला की ’भट्टी जमली’ असा त्यांचा निष्कर्ष असे. हे गोळे काही किल्यांच्या भिंतींना आजही चिकटून आहेत, असे पहायला मिळते.
बुद्धिस्ट टेंपल, हटयोग केंद्र, न्यूयॉर्क मेडिकल सेंटर वरून आम्ही पुढे निघालो. अमेरिकेतील पहिली ओपन हार्ट सर्जरी या सेंटरमध्ये झाली होती. दूर एम्पायर स्टेट बिल्डिंग होती. अकरा सप्टेंबरला ही इमारत उडविण्याचाही अतिरेक्यांचा विचार होता. ’स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ वरही त्यांची नजर होती. पण वर्ल्ड ट्रेड सेंटरचीच निवड त्यांनी केली, कारण तोच हल्ला जास्त ’परिणामकारक’होईल, असे त्यांना वाटले आणि तसे झाले सुद्धा. हे सर्व विचार मनात येत होते, ते काही केल्या मनातून पुसले जात नव्हते.
यानंतर बसमधून दिसू लागली युनायटेड नेशन्सची भव्य इमारत. 24.10.1945 ला दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्स या जुन्या जागतिक संघटनेची जागा युनायटेड नेशन्सने घेतली. आता जगातील 192 राष्ट्रे या संघटनेची सदस्यता स्वीकारून आहेत. अधिवेशन सुरू असतांना या इमारतीसमोर या सर्व राष्ट्रांचे राष्ट्रध्वज फडकत असतात. या ठिकाणी सर्व राष्ट्रांची कॉन्सुलेटस आहेत. ’एम्बसीज’ (वकिलाती) नाहीत. जनरल असेम्ब्ली, सिक्युरिटी कौन्सिल, एकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल, ट्रस्टीशिप कौन्सिल, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस, सेक्रिटॅरिएट असे सहा भाग असलेली ही संघटना मर्यादित स्वरूपात का होईना पण शांतता राखण्यास आणि जगाच्या कल्याणाच्या कामी उपयोगी सिद्ध झाली आहे.अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन व फ्रान्स या दुसर्या महायुद्धाच्या शेवटच्या काळातल्या बड्या राष्ट्रांना सिक्युरिटी कौन्सिल मध्ये ’व्हेटो’ किंवा नकाराधिकार आहे. त्यामुळे अकरा सदस्यांच्या या कौन्सिलने पारीत केलेले ठराव निष्प्रभ करण्याचा अधिकार या पाच बड्यांना बहाल करण्यात आलेला आहे. न्यूयॉर्क मधील एकेक वास्तू एकेक ऐतिहासिक पर्व मनात सजीव करीत होती.
न पुसल्या जाणार्या खुणा
नंतर आम्ही वर्ल्ड ट्रेड सेंटर ज्याजागी उभे होते, त्या जागेला वळसा घालून पुढे निघालो. नागपूरच्या पटवर्धन ग्राऊंड इतक्या मोठ्या परिसरातील ही इमारत दोन विमानांची धडक बसून बेचिराख झाली होती. 72 आणि 64 क्रमांकाच्या मजल्यांना विमानांनी धडक मारली होती. यांच्या खालच्या मजल्यावरची अनेक माणसे एवढे जिने उतरून खाली उतरू शकली. यात आपल्या कुत्र्याच्या मदतीने उतरणारी एक अंध व्यक्तीही होती. पण 120 मजल्यांच्या या इमारतींमधले 72 आणि 64 मजल्यांच्या वर अडकून पडलेल्या माणसांची अक्षरश: ’वाफच’ झाली.
या इमारतीच्या शेजारच्या इमारतींनाही भरपूर झळ पोचली. या पैकी एक ’भाजलेली’ इमारत आम्हाला रस्त्यावरून दिसली. ही इमारत पाहून आगीत भाजलेला माणूस जसा दिसावा तशी ही इमारत दिसत होती.
टायटॅनिक आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या जखमींना एकाच हॉस्पिटलमध्ये उपचार
एकोणीसशे बारा साली जगातली त्या काळची सर्वात मोठी नौका टायटॅनिक हिमनगाला खरचटून गेल्यामुळे दुभंगून बुडाली होती. त्यातले वाचलेले प्रवासी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ’हादशातून’ कसेबसे जिवंत बाहेर पडलेले नागरिक या दोन्हीवर एकाच हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्या हॉस्पिटलसमोरून आमची बस पुढे सरकली.
हॉटेल प्लाझा
पुढे लागले हॉटेल ’प्लाझा’. आपल्या मुंबईचे ताज हॉटेल याच हॉटेलच्या धर्तीवर बेतलेले आहे, असे म्हणतात आणि मानतात. (याच ताजवर अतिरेक्यांनी 26 नोव्हेंबरला हल्ला केला होता). निरनिराळ्या राष्ट्रांचे प्रमुख प्लाझा मध्येच मुक्काम करतात. तिथूनच ते युनायटेड नेशन्सच्या सभेत सामील होण्यासाठी जात असतात. हॉटेलच्या इमारतीवर तिरपा कोन करून लावलेले स्तंभ दिसले. जेव्हा एखाद्या राष्ट्राचा प्रमुख या हॉटेलमध्ये मुक्कामाला असतो तेव्हा त्या राष्ट्राचा ध्वज या स्तंभावर फडकत ठेवण्याची प्रथा आहे.
परिचित दृष्ये
या दरम्यान काही आश्चर्यकारक दृष्ये दिसली. सायकल रिक्षा चक्क न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून ’सवारी’ घेऊन जात होती. क्षणभर आपण नागपूरलाच आहोत, असे वाटले. सायकल रिक्षातून फेरफटका मारावा, असा विचार मनात आला. पण रिक्षेचे भाडे किमान पंधरा डॉलर (750 रू) ऐकून ’रिक्षात काय नागपूरलाही बसता येईल’, असा पोक्त विचार केला.
पुढे लागला न्यूयॉर्कचा प्रसिद्ध सेंट्रल पार्क. या ठिकाणी निम्मी बस रिकामी झाली. अडीच मैल लांब आणि दीड मैल रुंद अशा विस्तीर्ण परिसरात हा पार्क अक्षरश: पसरला आहे.
अमेरिकेवर भारताची मात
पुढचा थांबा होता, टाईम्स स्क्वेअर . इथून मादाम तुसाच्या म्युझियमकडे जायला पायी निघालो. रस्त्यावर भरपूर गर्दी होती. मुंबईची आठवण झाली. रस्त्यावर सिगारेटची थोटके, कचरा, खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर त्यावरची वेष्टणे जगोजागी दिसली. स्वच्छतागृहे अस्वच्छ होती. तेवढ्यातच एक टॅक्सीवाला आणि त्यातला उतारू यांचे भर रस्त्यात टॅक्सी थांबवून चाललेले भांडण दिसले. वाहतूक खोळंबली होती. एका बसवाल्याने जोराजोरात हॉर्न वाजवून ’अमेरिकन पद्धतीने’ शिव्या हासडल्या. हे सगळे बघितले आणि ’आपल्यात आल्यासारखे’ वाटले. फरक माणसांच्या रंगात होता. काळे होते, गोरे होते, मिचमिच्या डोळ्यांचे चिनी जपानी होते. एशियन म्हणजे इंडियन, पाकिस्तानी, सिलोनी, बंगलादेशी एकमेकापासून ओळखता येत नव्हते, पण ते सुद्धा होते. न्यूयॉर्कचा हा गजबजलेला रस्ता आपल्या भारतातल्या रस्त्यांचे प्रतिनिधित्व करीत होता. या बाबतीत भारताने अमेरिकेशी बरोबरी साधली होती.फक्त एकच फरक दिसत होता. रस्त्यावर खड्डे मात्र नव्हते !
गांधी, अमिताभ, मर्लिन मनरो आणि मी
मॅडम तुसा आणि तिचे मेणाच्या बाहुल्यांचे प्रदर्शन एक अजब चीज आहे. आता शेकडो कारागिरांच्या साह्याने मेणाच्या मूर्ती तयार करून लंडन, न्यूयॉर्क, वॉशिंगटन आदी ठिकाणी ही प्रदर्शने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. प्रदर्शनात आपले महात्मा गांधी आणि अमिताभही होेते. डायनाही होती. तिचे सुंदर रूप पाहून तिच्या शोकांतिकेचीच आठवण होत होती व मन उदास होत होते.
बाकी इतर अनेकांची भेट वॉशिंगटनला तुसाच्या प्रदर्शनात झाली होती. त्यात लिंकन होता, मार्टिन ल्यूथर किंग होता, जॉन एफ केनडी होते, त्यांची पत्नी जॅक्वेलीन केनडीही होेती. इथे मर्लिन मन्रोही होती. सौभाग्यवतीची अनुमती घेऊन तिच्या शेजारी उभा राहलो. ’फोटो काढू नको, काढू नको’, असे म्हणण्याचा विचार अनेकदा मनात आला.पण तेवढ्यात अजितने मला (नव्हे आम्हाला, म्हणजे मी आणि मर्लिनला) अचूक टिपलेच.
या प्रदर्शन स्थळासमोर कलाकारांनी आपले बस्तान बसवले होते. मला आपल्या इथल्या बुटपॉलिशवाल्यांची आठवण झाली. फक्त यांची आसने चांगलीच उंच होती. समोर खुर्च्या होत्या.पोर्ट्रेट काढणारे, तुमचे शिल्प बनवणारे, उत्तम अक्षरात गिर्हाइकांच्या नावांच्या पाट्या तयार करताना रंगीबेरंगी रंगातही रंगसंगती साधणारे ‘लेखकही’ होते. डोरा, बार्बी ही अमेरिकेतील तिन्ही पिढ्यांच्या आवडत्या बाहुल्यांची नावे आहेत. यांच्या चित्रांसोबत तुमची नावे लिहून मिळत होती. मेहताना फक्त(?) 5 डॉलर इतका होता. हे कसबी कलाकार बहुतेक चिनी, जपानी, मंगोलियन वाटत होते. त्यांच्या कुंचल्यात आणि बोटात कला होती. गिर्हाइकांना आकर्षित करण्याचेही कसब होते. गिर्हाइकांसोबत घासाघीस करण्यात ते तरबेज होते. ’खूपच कमी देता आहात, फार नुकसान होते आहे’, असे म्हणून चेहर्यावर बापुडवाणा भाव आणित ते गिर्हाइकांचे खिसे खाली करीत होते. परतायची घाई नसती तर पोर्ट्रेट, शिल्प आणि रंगीत अक्षरात नावे हे तिन्ही सोपस्कार मी नक्कीच करून घेतले असते.

No comments:
Post a Comment