Tuesday, June 27, 2017

(१६) अमेरिकन धोबी



     तसा धोब्याचा आणि माझा संबंध आम्ही अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव येथून नागपूरला ज्येष्ठ बंधूंकडे रहायला आलो आणि मगच आला. नागपूरच्या मेयो हॅास्पिटलमध्ये आमचे कपडे धुण्या आणि इस्तरी साठी एक धोबी घेऊन जात असे. तो कामठीहून दर रविवारी यायचा. अगोदर नेलेले कपडे धुवून इस्तरी करून घेऊन यायचा. नागपूर कामठी हे १०/१२ मैलाचे अंतर सायकलवर कापीत यायचा. कामठी त्याकाळी तसे लहानच गाव होते. ह्या धोब्याने तिथे आपले दुकान का थाटले ते कळेना. नसत्या चौकशा म्हणून म्हणा किंवा कुतुहल म्हणून म्हणा शेवटी मी त्याला हा प्रश्न विचारलाच. नंतर कळले की त्याचे आजोबा आंध्रातून एवढ्यासाठी कामठीला आले होते. आता कुतुहलाची जागा आश्चर्याने घेतली. तपशील कळला तो असा की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांची छावणी कामठीला होती. सहाजीकच बाजारबुणगे गोळा झाले. बाजार बुणगे या शब्दाला तेव्हा आता सारखा वाईट अर्थ नव्हता. सैन्य जिथे जिथे आणि जसजसे जाई तसेतसे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लहानसहान कारागीर, छोटे व्यापारी मागेमागे जात असत. त्यांनाबाजार बुणगे म्हणत. याचे धोबीकाम करणारे आजोबा छावणीचा मुक्काम कामठीला म्हणून आले होतेयांना 'अण्णालोक' म्हणत असत. अण्णालोकांची ही तिसरी पिढी होती.ही तिसरी पिढी होती. हळूहळू या मंडळींची नजर नागपूर सारख्या त्याकाळच्या राजधानीकडे वळती तरच नवल होते. त्यामुळे आम्ही म्हणत असू की, पंडित नेबरूंचे कपडे जसे धुण्यासाठी पॅरिसला जात असत, तसे आमचे कपडे धुण्यासाठी कामठीला जातात.नंतर आम्ही मोयो हॅास्पिटलचा परिसर सोडून नागपुरातच दोनतीन ठिकाणी स्थानांतर केले. पण आमची 'अण्णाची' साथ आताआतापर्यंत कायम होती. सद्ध्या घरापासून फर्लांग दोन फर्लांगावर धोब्याची दुकाने /वा टपय्रा आहेत. दाराशी येऊन इस्तरी करणारी हातगाडीही आताशाच दिसत नाही.

     अमेरिकेत आल्यानंतर एका विवाह समारंभाला उपस्थित  राहण्याच्या निमित्ताने धोब्याकडे कपडे इस्तरीला टाकण्याचा  प्रसंग उद्भवला. मोजून २५   २५ कपड्यांचे गाठोडे घेऊन मैल अंतरावरच्या धोब्याच्या दुकानात जाताच रांगेत उभे राहून फोन नंबरच्या आधारे नोंद होऊन रीतसर पावती मिळाली. फक्त(?) ५० डॅालर बिल झाले होते. दुसरे दिवशी कपडे धुवून इस्तरी करून/ ड्राय क्लीन होऊन मिळणार होते. एक दिवस सोडूनच जावे असा माझा विचार होता. कारण अजून झाले नाहीत, उज्या या हे ऐकायची सवय होती. पण 'इथे' असे नसते. कपडे ड्राय क्लीन होऊन तयार असतील, हे ऐकूनही साशंक मनानेच दुकानात गेलो रांगेत उभे राहिलोलगेचच आमचा नंबर आला. फोननंबरवर क्लिक करून एक नोंद बाहेर आली. दुकानात क्षितीज समांतर रहाटगाडगे फिरले थोड्या वेळाने थांबले. आमचे ड्राय क्लीन झालेले कपडे ओळीने हँगरला लावले होते. दुसय्रा रहाटगाडग्यावर असेच धुवून इस्तरी केलेले कपडे आले. ते सर्व हँगरसकट आमच्या स्वाधीन  होताच 'हॅव गुड डेकिंवा असेच काहीतरी ऐकून बाहेर पडलो. सोबत एक नोंद होती. अमक्यातमक्या कपड्यावरचा डाग पूर्णपणे निघू शकला नाही. आणखी प्रयत्न केला असता तर कपडा 'डॅमेज' होण्याची भीती होती

No comments:

Post a Comment