२५.५.२०१७ तयारी प्रवासाची (१)
ॐ
व.ग.काणे
एल बी.7,लक्ष्मीनगर,
पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर - 440 022.
दूरध्वनी/फॅक्स (0712)2221689 9422804430
चि श्री सुभाष,शरद आणि श्रीराम यास,
आमच्या अमेरिकेच्या वारीत तुम्हा तिघा भावांचे साह्य व सहकार्य खूपच मोलाचे ठरले.
व्हिसासाठी मुंबईच्या तारखा संपल्या होत्या. दिल्लीची तारीख मिळाली. त्या निमित्ताने सुभाषने विमानतळावर येऊन घरी घेऊन जाणे, व्हिसासाठी आम्हाला ’तयार’ करून अमेरिकन एंबसीपर्यंत नेऊन, आम्ही सुखरूप बाहेर येईपर्यंत तास/दोन तास आमची प्रतीक्षा करीत उन्हात थांबणे(या वेळी गौरीची बरीच गैरसोय झाली), सर्व कामे सुरळीतपणे आटोपल्यावर नवी दिल्ली स्टेशनवर पोचविणे, या गोष्टी तशा साध्या वाटतील अशा असल्या तरी आम्हाला या गोष्टी केवळ ’आमच्या भरवशावर’ साधणे बरेच कठीण गेले असते.
यावेळी व्हिसाच्या मुलाखतीचा धाक मनात चांगलाच घर करून होता. दहशतवादाचे सावट तर होतेच. आम्ही वॉटर बॅाटल सोबत घेतली होती. आत जाण्याच्या अगोदर तपासनीसाने आम्हाला त्याच्यासमोरच त्या वॉटर बॉटल मधून ’दो घूट’ पाणी पिण्यास सांगीतले आणि आम्हाला पहिला धक्का दिला. काकूचा व्हिसा पटकन मान्य झाला माझ्या बाबतीत उजव्या आणि डाव्या हाताच्या ठशांची अदलाबदल झाली होती. त्यामुळे ठसेच जुळत नसतील तर इथेच निकाल लागणार म्हणून मी हादरलोच. पण समोरच्या खुर्चीवरच्या महिला अधिकार्याने सुहास्य वदनाने मला पुन्हा ठसे देण्यास सांगीतले. मी ठसे देऊन परत आलो तेवढ्यात चार नंबर पुढे सरकले होते. त्यामुळे माझा व्हिसा काकूच्या व्हिशानंतर दुसर्या दिवशी आला. त्याहीवेळी हृदयाचे ठोके वाढलेच होते कदाचित काही चुकलेही असतील . असो.
निघण्याच्या चार दिवस अगोदर काकूच्या ’दाताने दात धरला’ आणि ’दावा साधला’.आम्ही प्रवास रद्द करण्याचेच ठरवत होतो. पण श्रीरामच्या औषधाने शारीरिक वेदनांपासून सुटका केली आणि विद्याने ’होसला वाढविण्याचे’ काम केले. दातदुखी दूर व्हावी म्हणून म्हणून (दुसर्या डॉक्टरने) दिलेले औषध ’उतले’ होते आणि उपाय किती झाला ते सांगता येणार नाही पण उपद्रव मात्र चांगलाच झाला होता.
15 जून म्हणजे आपल्या इथे पावसाचा ऐन हंगाम. त्यामुळे याही वेळी 26 जुलै प्रमाणे मुंबई जलमय झाली तर काय करता? त्यावेळी चार दिवस मी मुंबईत अडकून पडलो होतो.म्हणून सर्व प्रतिकूलतांचा विचार करून योजना आखली होती.14 आणि 15 या दोन्ही तारखांचे रेल्वेचे तिकीट काढले होते. कोणतीतरी एक गाडी नक्कीच सुटेल, असे गृहीत धरले होते. तसेच 14 तारखेचे विमानाचे तिकीटही काढले होते, ते वेगळेच.14 जूनला विमानाने मुंबईसाठी उड्डाण करताच शैलेशला रेल्वेची तिकिटे परत करण्यास सांगीतले या निमित्ताने रेल्वे मंत्री ममता बॅनर्जीच्या (कदाचित त्यावेळी लालूच रेल्वे मंत्री असण्याची शक्यता आहे.) तिजोरीत आम्ही भरघोस भर घातली. पण मुंबईला वेळेवर पोचलो नसतो तर विमानचे तिकीट वाया जाऊन लाखमोलाचा फटका बसला असता.
मुंबईला विमानतळावर शरद आला होता. त्यामुळे ’घरी जाणे’ सोपे झाले. मध्ये एक दिवस मुद्दामच ’हातचा’ ठेवला होता. शरद आणि रेखाने प्रवासाची सगळी ’उजळणी’ करून घेतली. प्रवासात गरज भासली तर जवळ हाताशी असावेत यासाठी ’तहानलाडू, भूकलाडू’ म्हणून ’सँडविचेस’ बांधून दिले होते.ती दोघे आम्हाला विमानतळवर सोडायला आली होती. आम्हाला ’काँटिनेंटलच्या’ स्वाधीन करून मगच ती घरी दोघे घरी परतली.
मुंबई ते नेवार्क या प्रवासात अक्षरश: काहीही त्रास न होता आम्ही नेवार्कला पोचलो. दोनऐवजी एकच व्हिल चेअर मिळाली पण त्याचा त्रास झाला नाही.विमानतळावर सगळे चालणे ’आतल्या आतच’ होते. पुढची विमानफेरी ’नेवार्क ते क्लीव्हलँड’ ’री शेड्यूल’ झाली होती. तसेच मध्येच खोळंबा झाल्यामुळे उशीरानेही आली होती . दोन/तीन प्लॅटफॉर्म बदलावेही लागले.
कस्टमचा मात्र मुळीच त्रास झाला नाही . आमच्या बॅगा अशा तडकाफडकी आणि झटपट स्वीकारल्या गेल्या की त्यामुळेच काळजी वाटू लागली.’आमच्या बॅगा क्लीव्हलँडच्या विमानात ठेवल्या जातील ना? की त्यासाठी ’आम्ही काही करावयास पाहिजे?’, असा ’बावळट’ प्रश्न मी दोन/तीन ठिकाणी विचारला तेव्हा तिकीट पाहून,’तुमच्या दोन बॅगा आहेत,त्या क्लीव्हलंडला जाणार्या विमानात नीट ठेवण्यात येतील’, असे प्रत्येक वेळी सांगण्यात येत होते. शेवटी , ’आमच्या दोन बॅगा आहेत,हे तुम्हाला तिकीट कसे पाहून कळले?’,अस विचारून मी ’खुंटी हलवून पक्की करण्याचा’ प्रयत्न केला. तेव्हा तिकिटावरच्या अनेक आकड्या आणि अक्षरातून दोन हा अंक त्या बाईने (आतापर्यंत भेटलेल्या सर्व बायाच होत्या)अचुक आणि पटकन पेनने खूण करून दाखविला.
इथे एक वेगळीच अडचण समोर आली. आमचे दोन्ही मोबाईल्स काम करीनात. शरद आणि शैलेशला अनुक‘मे नागपूरला व अजू आणि नीलमला इरीला कळवण्याची ’भरपूर तजवीज’ नागपूरहूनच केलेली होती पण एअरटेलचा सिग्नल जो ’गायब’ झाला तो आजतागायत तसाच कायम आहे. अजूला कळवावे या हेतूने फोन करण्यासाठी बूथवर गेलो तो तिथे एक डॉलरचे नाणे टाकण्याची सूचना होती. माझ्याजवळ एक डॉलरच्या नोटा होत्या आणि क्वार्टरची नाणी होती. पण हिंदुस्थानात रुपया म्हणजे रुपयाचेच नाणे टाकावे लागते, दोन आठ आणेल्या (पन्नास पैसेल्या) चालत नाहीत. तसाच प्रकार असेल असे समजून गप्प बसलो.(पण चार क्वार्टर टाकून चालले असते, असे इथे इरीला आल्यावर कळले) शेवटी विमान येण्याची वाट पाहत स्वस्थ बसलो.
एवढ्यात एक गोष्ट अशी घडली की ज्यामुळे ’आपली अनुभवजन्य श्रेष्ठता आणि ज्येष्ठता’ आम्हाला जाणवली. एक गुजराथी म्हातारी बाई फ्लाईट चुकून एकटीच ’मागे’ राहिली होती. तिलाही क्लीव्हलंडलाच जायचे होते. एकटी बाई, गुजराथी शिवाय दुसरी भाषा येत नाही आणि व्हील चेअर सोडून ’चालता’ येत नाही , अशी तिची अवस्था होती. तिलाही क्लीव्हलंडलाच जायचे होते आणि तिची आणि आमची विमानाची फेरीही एकच होती हे तिचे तिकीट पाहून कळले. तेव्हा तिला आम्ही सोबत घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. यामुळे तिचा जीव भांड्यात पडला. हे जसे जाणवले तसा आमचा स्वत:चा ’आत्मविश्वास’ वाढला.कारण आता आम्ही तिचे ’मार्गदर्शक, सहाय्यक, भाषांतरे, व्हील चेअर ढकलणारे,’ अशा सगळ्या भूमिका आम्ही पार पाडणार होतो.विमानात चढताचढता एक गुजराथी पोर्टर का पुशर (व्हील चेअर ढकलणारी) बाई येऊन तिचे ’क्षेम’ विचारून गेली. असा अनुभव ’आपल्या मराठी लोकात’ आला असता का, असा विचार मनात डोकावून गेला.
क्लीव्हलंडला त्या गुजराथीबाईचा मुलगा तिला ’घ्यायला’ आला होता तर अजू आम्हाला ’न्यायला’ आला होता.(तिचा मुलगा तिला घ्यायला आला होता असे म्हणण्याचे कारण असे की, तिला क्लीव्हलंडलाच जायचे होते. अजू आम्हाला ’न्यायला’ आला होता, असे म्हणण्याचे कारण असे की, आमचा पुढचा दोन तासांचा प्रवास (ताशी सत्तर मैल म्हणजे जवळजवळ एकशे पाच किलोमीटर वेगाने अजून बाकी होता.)त्या मायलेकांनी आम्हाला हात दाखवून आमचा निरोप घेतला. त्या दोघांच्याही चेहर्यावर दिसणारी आनंदमिश्रित कृतज्ञता आम्हाला जाणवली.
इथे आल्यावर आमचे मोबाईल ’ठप्प’ का झाले होते, ते कळले. मोबाईल ’ट्रायबँड’ असणे आवश्यक होते पण आमचे अगदीच ’गावठी’ होते.
आमची कार सुसाट धावत होती. पाऊस पडत होता. एक मजेशीर प्रकार पहायला मिळाला. समोरच्या काचेवर पडणार्या पाण्याचे ओघळ खाली न सरकता वरवर सरकत होते.यामागचे ’फिजिक्स’ समजावून सांगण्याचा प्रयत्न अजूने केला. ’ते ओघळ खाली न येता वरवर का जात होते,’ हे मला समजले अशी मी स्वत:ची समजूत करून घेतली आणि दुसर्या विषयाकडे बोलण्याचा ’ओघ’ वळवला.
इरीचा उन्हाळा सुरू होता. पण आमच्यासाठी तो हिवाळाच होता. यंदा इथे पावसाळा रेंगाळला आहे. त्यामुळे पाऊस चुकवीत आणि अजूच्या सुट्ट्या साधीत ’प्रेक्षणीय स्थळे’ पाहणे आणि आमची ’प्रेक्षणीयता’ इतरांना दाखविणे हा प्रकार सुरू आहे. त्याचे फोटो ’आर्कुट’वर आहेत. त्यामुळे ते तुम्हाला पाहता आले असतील आणि भविष्यात येतील, असे वाटते.
औपचारिकता दिसेल असे वाटत असूनही औपचारिकतेकडे दुर्लक्ष करून सर्व हकीकत तुम्हा तिघांना सविस्तर कळविली आहे. आपल्या तिघातले हे बहुदा पहिलेच पत्र ठरेल पण हा ’सिलसिला’ इथेच थांबणार नाही, असे आश्वासन देऊन पत्र आटोपते घेतो.
आपल्या तिघांच्या सौभाग्वती आणि चिरंजीव यांचा स्वतंत्र आणि वेगळे उल्लेख करून हे पत्र संपवतो. ती वहिनींना साष्टांग नमस्कार.
आपला
वसंतकाका
(श्रीरामला खास विनंती की, माझे हे पत्र शरद आणि सुभाषला ईमेलने पाठवावे. माझ्या ईमेल्स बाउन्स होत आहेत.)

No comments:
Post a Comment