’ भारतीय आणि चिनी मुलांसारखे अभ्यासू व्हा’
अमेरिकेचे अध्यक्ष बरॅक ओबामा यांचा अमेरिकन मुलांना हितोपदेश
व.ग. काणे, एल बी7, लक्ष्मीनगर, नागपूर -440 022
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून येण्याच्या अगोदरपासून बरॅक ओबामा आपल्या भाषणातून एक मुद्दा प्रमुखपणे जनतेसमोर ठेवीत असत. भारतीय आणिचिनी मुलांशी स्पर्धा करावयाची असल्यामुळे अमेरिकन मुलांचा शैक्षणिक स्तरवर नेण्याची आवश्यकता आहे, हा विषय ते अनेक भाषणातून जोरकसपणे अमेरिकन जनतेसमोर मांडीत होते.
अमेरिकन मूल सामान्य दर्जाचे असून चालणार नाही.
शिक्षणाचा स्तर उंचावला पाहिजे, यावर भर देत असतांनाच अमेरिकन मुलांनी अधिक झटून अभ्यास केला पाहिजे, असा त्यांचा आरह असे. केवळ प्रश्नपत्रिकांचा (परीक्षांचा) स्तर वरचा असून चालणार नाही, तर यापेक्षा अधिक प्रभावी व परिणामकारक उपाय केले पाहिजेत, यावर त्यांचा भर असे.
ओबामा म्हणायचे, 'आपली मुले सामान्य दर्जाची असून चालणार नाही. त्यांना भारतीय आणि चिनी मुलांबरोबर स्पर्धेत उतरावयाचे आहे, हे लक्षात घेऊन आपण शिक्षणक्रमाची आखणी केली पाहिजे. या मुलांच्या शाळा (भारतीय व चिनी) आपल्या शाळांपेक्षा जवळजवळ महिनाभर अधिक काळ पर्यंत चालतात, असे त्यांनी उदाहरणादाखल सांगितले. अमेरिकेतील शिक्षण पद्धतीचामुळापासून व नव्याने विचार करण्याची आवश्यकता त्यांनी कॅलिफोर्नियातील एका सभेत नुकतीच पुन्हा एकदा बोलून दाखविली.
पालकांनो, आपली जबाबदारी ओळखा.
ओबामांनी या निमित्ताने आणखी एक मुद्दा नव्याने व जोरकसपणे मांडला आहे. शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी केवळ शिक्षकांचे प्रयत्न पुरेसे पडणार नाहीत तर त्यांना पालकांकडून बरोबरीने साथ मिळाली पाहिजे, असे ते आगहाने म्हणाले. शाळा व शिक्षकांवर मुलाच्या शिक्षणाची व संस्काराची सगळी जबाबदारी सोपवून पालकांना स्वस्थ व निश्चिंत बसता येणार नाही. आपले मूल गृहपाठ करते आहे किंवा नाही हे पालकांनी पाहिले पाहिजे. चांगल्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत, वाचून दाखविल्या पाहिजेत. आपली मुले सर्वोत्तमाची कास धरतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे व तसा आगरह धरला पाहिजे.नवीन ज्ञानप्राप्त करण्यासाठी आपली मुले आसूसलेली असली पाहिजेत, ज्ञानप्राप्तीचाध्यास त्यांनी घेतला पाहिजे.यासाठी पालकांची जबाबदारी फार मोठी आहे, हेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे.एकटा शिक्षक चांगला असून भागणार नाही. त्यालापालकाची साथ मिळणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
आमचे काय चालले आहे?
अमेरिकेच्या अध्यक्षांचे हे विचार ऐकले की एक जाणवते ते हे की ’ हेपाणी काही वेगळेच आहे ’ एक भोगवादी समाज म्हणूनच आपल्यापैकी अनेकांना अमेरिकन लोकांचे जीवन माहीत आहे. चंगळवाद आपण अमेरिकेकडून अनुकरणकरीत स्वीकारला असून त्यात आपल्याला काहीही गैर वाटत नाही. पण खुद्द अमेरिकेतील कर्तेधर्ते काय विचार करीत आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भारतीय विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य
या निमित्ताने एका गोष्टीचे स्मरण होते. एकदा शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाची तत्कालीन शिक्षण सचिव श्रीमती कुमुद बन्सल यांचेशी चर्चा सुरूहोती. विषय होता,’परीक्षा पद्धतीत बदलाची आवश्यकता’. आपल्या येथीलसततच्या परीक्षा ह्या चरकासार‘या आहेत. त्यातून विद्यार्थी अक्षरश; पिळून निघतो आहे, असा काहीसा विचार कुणीतरी मांडला. यावर श्रीमती बन्सलम्हणाल्या, ’आपल्या परीक्षा पद्धतीत बदल करायला हवाच आहे. याबद्दल दुमतनाही’. पण माझ्याजवळ आता उपलब्ध असलेली आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. सध्या जगातल्या अनेक देशातील विद्यार्थी दुसर्या देशात शिक्षणासाठी जात असतात. त्यापैकी काही विद्यार्थी तिथले वातावरण, परीक्षापद्धती, शिक्षण पद्धतीशी जुळवून न घेता आल्यामुळे आपल्या देशात अभ्यासक‘ममध्येच सोडून परत येतात. या विषयाची ही आकडेवारी आहे. अशा विद्यार्थ्यातपरदेशातील शिक्षण पद्धतीशी जुळवून घेता न आल्यामुळे परत येणार्या भारतीयविद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. परीक्षांच्या, अभ्यासक‘माच्या, अभ्यासाच्याचरकातून पिळून बाहेर पडणारा आपला विद्यार्थी जगातल्या कुठल्याही शिक्षणक‘माशी सहज जुळवून घेतो. त्याला तक‘ार करण्याचे नाही तर जुळवूनघेण्याचे जणू बाळकडूच मिळालेले असते. आपल्या येथील शिक्षण पद्धतीत/ परीक्षा पद्धतीत दोष आहेत व ते दूर केलेच पाहिजेत हे खरे पण आपल्या येथीलविद्यार्थ्यांचे ’हे’ वैशिष्ट्यही लक्षात ठेवले पाहिजे.
समस्येवर तुटून पडायचे असते
’सध्या सॉफ्ट पेडॉगॉजीचा’ जमाना आहे. ’थोडंथोडं, सोपंसोपं शिकवा ताण पडू देऊ नका.अभ्यासाचं/परीक्षांचं ओझं वाटू देऊ नका,गृहपाठ देऊ नका, शाळेतच अभ्यास करून घ्या ’, ही आणि अशा आशयाची घोषवाक्य आपल्याकानावर सतत पडत असतात.हे मुद्दे पूर्णत; चूक आहेत, असे कुणी म्हणणार नाही. पण ’बी एड’ ला असतांना आमचे एक प्राध्यापक श्री दक्षिणदास यांच्या तोंडी एक वाक्य नेहमी येत असे. ’आस्क द चाईल्ड टू अटॅक द प्रॉब्लेम’ प्रश्नाचा सामना करायला शिकवा, त्याच्यावर तुटून पडायला शिकवा, असे ते म्हणत. ’प्रश्न सोडवणे’ हा शब्दप्रयोग त्यांना मिळमिळीत वाटत असे.गणितात प्रश्न सोडवायचे नसतात तर प्रश्नांवर तुटून पडायचे असते, ही त्यांची भूमिका असे.
जरा सबुरी हवी
सध्या पाश्चात्यांच्या अंधानुकणाची टूम आपल्या येथे फोफवते आहे. पाश्चात्यांना ज्या गोष्टींचा त्याग करावा असे अनुभवांती वाटू लागले आहे, त्याआपण उराशी कवटाळू पाहतो आहोत, असेही कधीकधी वाटून जाते. अशावेळी जरा सबुरीची भूमिका घेतली पाहिजे. ’पाठांतर ( घोकंपट्टी नव्हे), वर्गनायकपद्धती (खालच्या वर्गातील मुलांना वरच्या वर्गातील मुलांनी शिकवण्याची गुरुकूल पद्धतीतील प्रथा), गुरूशिष्य संवाद हा आपल्या येथील शिक्षणपद्धतीचा आधार होता. युगानुकूल बदल करीत असतांना युगेयुगे तावून सुलाखून कसोटीला उतरलेल्या वारशाचे महत्त्व आपण विसरता कामा नये. अमेरिकेला जे कळते ते नंतर आपण स्वीकारतो. अमेरिकेला जे जाणवले आहे, ते अध्यक्ष ओबामा यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाले आहे. त्यामुळे ते आता आम्हाला पटायला हरकत असू नये.
.