(२३) स्कंक पुराण
वसंत गणेश काणे,
बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्च्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
दूरध्वनी - ९४२२८०४४३० / (०७१२)२२२१६८९
हल्ली मुक्काम - २२१५ लाईव्ह ओक लेन,
यॅार्क, पेन्सिलव्हॅनिया
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
एके दिवशी भल्या पहाटे आमच्या घरासमोरून गेलेल्या कारखाली एक प्राणी चिरडला गेला आणि आसमंतात असह्य दुर्गंध पसरला. तो सहन होत नव्हता पण सर्वजण, 'स्कंक' होता वाटतं असं म्हणून मुकाट्याने आपले दैनंदिन व्यवहार उरकू लागल्यामुळे माझे औत्सुक्य जागे झाले. शोध घेतला तेव्हा दिसले की, या प्राण्याची नोंद डार्विनने आपल्या बिगल जहाजावरील प्रवासादरम्यानच्या नोंदीत केलेली होती. डार्विनने लिहिले आहे, आम्हाला झोरिलाॅ किंवा स्कंक नावाचे प्राणी दिसले. अतिशय तीव्र व असह्य स्वरुपाचा दुर्गंध हे प्राणी पसरवतात. मांजरापेक्षा थोडा मोठा पण अधिक जाड असा हा प्राणी आहे. आपल्या दुर्गंध पसरवण्याच्या शक्तीची जाणीव असल्यामुळे तो सर्वसंचारी आहे. तो न माणसाला घाबरतो न कुत्र्याला. त्याने फवारलेल्या द्रवाच्या वास असह्य असतो. नाक गळू लागते. त्याचा संसर्ग झालेली वस्तू टाकून देण्याशिवाय गत्यंतर नसते. हा दुर्गंध एक मैल अंतरावरच्या व्यक्तीला सुद्धा जाणवतो. एकदा वारा जमिनीकडून समुद्राकडे वहात होता, बिगल जहाजावरचे आम्ही सर्व लोक या दुर्गंधाने त्रस्त झालो होतो. त्यामुळे कोणताही प्राणी त्याच्या वाट्याला तर जात नाहीच पण त्याला वाटही मोकळी करून देतो. या निमित्ताने डार्विनचा अभ्यास कसा सर्वस्पर्शी होता, निरीक्षण किती बारीक होते आणि नोंदी कशा अचुक होत्या, ते नव्याने जाणवले.
पहिली नोंद(?) - या प्राण्याची रीतसर नोंद पाश्चात्यांनी १६३० साली घेतली, असे मानतात. याला पापाचे प्रतीक मानले आहे. याच्या शरीरावरील फर ( लोकरीसारखा) काळीकुळकुळीत, चकचकीत आणि चमकणारी असते. पाठीवर दोन पांढरे शुभ्र पट्टे असतात.ते समोर मानेकडे आणि मागे शेपटीकडे एकमेकाजवळ येऊन मिळतात. यामुळे हा प्राणी छान रुबाबदार व दिमाखदार दिसतो. शेपटी कोल्ह्यासारखी झुपकेदार असते. या प्राण्यालाही खारीच्या शेपटीसारखी तिची कमान करता येते. शेपटी मात्र पांढरी असते. पण रुपडे जेवढे छान, तेवढाच दुर्गंध भयंकर. कोणत्याही गटारातून बाहेर पडणारा वास याची बरोबरी करू शकणार नाही. हृदय बंद पडणार, असे वाटू लागते. हा वास अनेक दिवस पर्यंत जात नाही.
स्कंकचे भक्ष - स्कंकच्या अनेक जाती आहेत. सर्वात लहान अर्धा किलो वजनाचे तर सर्वात मोठे आठ किलो पर्यंत 'वजनदार' असतात. लांबी दीड ते दोन फूट इतकी असते. आखुड पण दणकट पायांना जमीन उकरता येईल, इतपत मोठी व शक्तिशाली नखे असतात.
सर्वभक्षी असलेल्या या प्राण्याचे अन्न कीटकांपासून तो उंदीर, सरडे, बेडुक, साप आणि पक्षी असे सर्वप्रकारचे असते. फळे, पाने, गवत यांचेही त्याला पथ्य नाही. उकिरडे फुकंण्याची त्याची सवय निर्माण होण्याचे एक कारण हे असावे की, मांजरासारखे प्राणी आपल्या भक्षाचे मास पुरतेपणी खात नसतात. ते हाडांचे तुकडे हे प्राणी चाटूनपुसून साफ करतात.
मधमाशा व मध हाही यांचा आवडता खाद्यपदार्थ आहे. फरमुळे हा स्वत: संरक्षित असतो. यांच्यापुढे मधमाशा नांगी टाकतात. प्रथम हल्ला करणाय्रा मधमाशांवरच हे 'स्टार्टरप्रमाणे' ताव मारतात. ही खाद्य संस्कृती मातेकडून पिल्लांकडे संक्रमित होत असते. जन्माला कारण एवढीच बापाची भूमिका असते.
जीवनक्रम - प्रजनन काळ सोडला तर हे प्राणी 'एकला चलो रे' पंथाचे आहेत. पण कडाक्याच्या थंडीत मात्र यांचा सहनिवास असतो. दिवसा ते बिळात राहतात. नर व माद्याची बिळे वेगवेगळी पण 'काॅमन वाॅल' सदृश असतात. थंडीत शीतस्वपन( हायबरनेशन) हा प्रकार या प्राण्यात नसतो. पण बाॅम्बहल्ल्यापासून संरक्षण व्हावे म्हणून माणसे ज्याप्रमाणे भूमिगत आश्रयस्थान निवडतात त्याप्रमाणे कडाक्याची थंडी असेल तर यांची झुंड जमिनीत एका ठिकाणी आश्रय स्वीकारून राहतात व एकमेकास बिलगून ऊबही देतात. पण ही पद्धत माद्यांमध्येच आढळते. 'नर एकला चलो रे', हाच मार्ग याही वेळी अनुसरतात. ही आश्रयस्थाने वर्षानुवर्षे तीच ती असतात.
संवेदनांगे - या प्राण्यांचे नाक व कान चांगलेच तिखट असतात. पण दृष्टी मात्र अधू असते. दहा फुटा पलीकडचे त्यांना दिसत नसते. म्हणूनच कदाचित एक प्राणी आमच्या घरासमोरून जाणाय्रा कारखाली चिरडला गेला असावा. वृद्धत्व म्हणजे जास्तीतजास्त सात वर्षे. सामान्यत: आयुष्य एक वर्षाचे तर माणसाळलेले व माणसाच्या आश्रयाने व आधाराने जगणारे प्राणी दहा वर्षे पर्यंतही जगतात.
बालसंगोपन - नर बहुस्त्रीक असतात. मादीचे गर्भारपण ६६ दिवसांचे असते. पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागताच नव्याने जन्माला येणाय्रा बाळांसाठी बिळे साफसूफ करून बिळात बाळंतिणीची खोली तीच तयार करते. एका वेळी चार ते सात पिलांना जन्म देते. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. तशीच ती लहानपणी ठार बहिरीही असतात. दोन महिने होईपर्यंत पिले आईच्या अंगावर पीत असतात. पण नंतर वयात येईपर्यंत आईच्या सोबतीनेच राहतात. बालसंगोपनात पित्याचा काहीही सहभाग नसतो.
अमोघ शस्त्र - स्कंक प्राण्याच्या शरीराला गुदद्वाराच्या दोन्ही बाजूंना दुर्गंधी द्रव निर्माण करणाय्रा दोन ग्रंथी असतात. हा गंधकयुक्त पदार्थ आहे. यात 'थियाॅल' हा पदार्थ असतो. याला व्यावहारिक भाषेत 'मरकॅप्टन' असे म्हणतात. याचा दुर्गंध इतका तीव्र असतो की, शत्रू अक्षरश: पळ काढतात. याचा फवारा कपड्यावर उडाला तर वास जाता जात नाही. कपडे टाकून देता येतात. पण अंगावर उडाला तर काय करणार? या ग्रंथीतून उडणारा फवारा दहा फुटापर्यंत पिचकारीतून उडावा असा उडतो. यामुळे अंगाची आग होते, तात्पुरते अंधत्व येते आणि तुमच्यापासून एक मैलावर ( होय एक मैल!) असणाय्रालाही हा वास येतो, अर्थात वारा तुमच्याकडून त्या दिशेला वहात असला पाहिजे.
उपाययोजना - हा फवारा आपल्या अंगावर उडाला तर काय? यावर एक घरगुती उपाय इथे सांगितला जातो. टोमॅटोचा रस अंगावर घासून सतत तीन/चार दिवस सचैल स्नान करायचे. पण बादलीभर टाॅमॅटोचा रस तयार करणे तसे कठीणच म्हणायला हवे. हायड्रोजन -पर -आॅक्साईड, बेकिंग सोडा आणि डिश वाॅशर मध्ये वापरायचा साबण हेही उपाय सांगितले जातात. शास्त्रीय दृष्ट्या सांगायचे तर उपाय म्हणून वापरायचा पदार्थ थियाॅल या विषारी घटकाचे विघटन करणारा असायला हवा, तसेच त्यापासून आपल्याला दुसरा एखादा त्रास व्हायला नको.
केवळ गल्लीतच नव्हे तर सर्वत्र शेर - आपल्या या सामर्थ्याची जाणीव असल्यामुळे हा प्राणी बेदरकारपणे वावरत असतो. इतर प्राणी त्याच्या वाय्रालाही उभे न राहता त्याला वाट मोकळी करून देतात. एखाद्या कुत्र्याला त्याच्यावर कुणी छू केले तर केवळ एक/दोन थेंबातच हा त्याला पळवून लावतो. त्याला पळता भुई थोडी होते. पण हे शस्त्र हा प्राणी अतिशय काळजीपूर्वक आणि नाइलाज असेल तरच वापरतो. अगोदर फिस्कारणे, पायांची आदळआपट करणे, शेपटीची कमान करणे असे सौम्य डाव आजमावून पाहतो. स्प्रे एकदा वापरला की दुसरा डोज ( १५ घन सेंटीमीटर) तयार व्हायला निदान पंधरा दिवस लागतात. या काळात मात्र तो बलहीन असतो. ही संधी कुत्री व घुबडे साधतात. या काळात तेही शेर असतात. स्वत: स्कंकावर बेधडक हल्ला करून त्याचा फडशा पाडतात. मात्र या शस्त्राचा उपयोग हे प्राणी आपापसात भांडतांना एकमेकावर करीत नाहीत. भांडणे बहुदा 'बीळ कुणाचे?', या निमित्तानेच होत असते. यावेळी ते दात व नखेच वापरून वेळ निभवतात.
मानवही काही कमी नाही.- स्कंक माणसाला चावल्याची उदाहरणे नाहीत. माणूसही एक अजबच प्राणी म्हणायला हवा. स्कंकच्या विषारी ग्रंथी आॅपरेशन करून काढून टाकून त्याला माणसाळवणारा माणूस हा एक बहाद्दर प्राणीच म्हटला पाहिजे. काहींना हे नसते उपद्व्याप वाटतील. असे स्कंक मात्र चावा घेतात, अशी माहिती आहे. यामुळे रेबीज ( पिसाळलेला कुत्रा चावल्यास होणारा रोग) हा रोग होऊ शकतो. असे स्कंक पाळण्याची मुभा ब्रिटनमध्ये आहे पण अमेरिकेत आज अशी अनुमती नाही.
असे आहे हे स्कंक पुराण! घरासमोरच एक स्कंक चिरडला जातो काय, त्याच्या वासाने आम्ही बेजार होतो काय, आणि शोध घ्यायचा प्रयत्न करताच ही त्याची जीवनगाथाच उलगडते काय? सगळ्याच योगायोगाच्या गोष्टी. आम्हाला भोगावे व शोधावे लागले पण वाचकांना ही माहिती सहज व विनासायास मिळणार आहे. असतात एकेकाचे भोग आणि योग! दुसरे काय!

No comments:
Post a Comment