(२५) गाठभेट डॉल्फिनशी
(माझी अमेरिकावारी)
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
अमेरिकेतील न्यूजर्सी प्रांतातील अटलांटिक सिटी या नावाच्या गावची (बीच)चौपाटी फारच चांगली मानली जाते. त्यामुळे या चौपाटीला भेट देण्याचा आमचा विचार ऐकून, ‘जाताच आहात तर डॉल्फिन पाहण्याच्या सफरीवर का जात नाही’, असे म्हणून कामवालीने आमच्यातल्या सिंद्बादला जागे केले. ‘सफारी काय फक्त सिन्द्बाद्नेच कराव्यात?’, असा प्रश्न स्वत:लाच विचारून आम्ही माहिती काढली आणि सफरीला निघालो.
दुसरा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
यॉर्क हे आमचे राहते गाव सोडले आणि लगेच एक नदी लागली. इथल्या नद्यांना भरपूर पाणी असते. ही नदी त्याला अपवाद नव्हती. ही नदी वाह्तावाहता लक्षावधी लोकांच्या पीकपाण्याच्या आणि काही प्रमाणात जलप्रवासाच्या गरजा भागवते. ‘ससक्वेहॅना’ अशा काहीशा नावाची ही नदी जगातल्या सर्वात प्राचीन नद्यांपैकी एक आहे. या नदीची दुसरी विशेषता अशी की हिच्या पात्रात ती समुद्राला मिळते त्याच्या जवळपास जगप्रसिद्ध ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ च्यापेक्षा तुलनेने एक लहानसा ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ आहे. हा पुतळा इथे कसा आला हे बरेच वर्षेपर्यंत एक रहस्यच होते. तिची कुळकथा अशी की, मूळच्या मोठ्या स्टॅच्यूला शंभर वर्षे झाली याची आठवण म्हणून स्त्लीप नावाच्या एका वकिलाने हा पुतळा गुपचूप बांधून घेतला आणि नदीच्या पात्रात नेऊन बांधला. त्याची ही कृती बेकायदेशीर तर होतीच पण तो कोसळला असता तर येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना धोका संभवला असता आणि सहा वर्षांनी घडलेही तसेच. तो पुतळा वादळाने उन्मळून पडला. पण तोपर्यंत लोकांना ही कल्पना भलतीच आवडली आणि भावली होती. आपल्या राज्याचाही एक ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ असला पाहिजे या विचाराने चांगलेच मूळ धरले होते. आता त्याच जागी एक भरभक्कम, पूर्वीच्या पुतळ्यापेक्षा उंच आणि वजनदार पुतळा गेली चौदा वर्षे दिमाखात उभा आहे. याच नदीवरील पुलावरून आम्ही पुढे निघालो.
रस्ते आणि रहदारीचे नियम
रस्ते दहा दहा लेनचे होते. पाच लेन्स एका दिशेने जाण्यासाठी तर पाच विरुद्ध दिशेने जाण्यासाठी. प्रत्येक लेनमधून ठराविक अंतर सतत ठेवीत ओळीने मोटारी ताशी सत्तर मैल (किलोमीटर नाही) वेगाने धावत होत्या. इथे येऊन आता महिना होऊन गेला आहे पण हॉर्न ऐकला नाही की रस्त्याने चालत जाणारी माणसे पहिली नाहीत. साडेसात हॉर्स पावरच्या मोटरसायकली धडाडत ओव्हरटेक करून जात. मोटरसायकली मागे, पिझ्झा घरपोच पोचवणारे ज्याप्रमाणे एक डब्बा लावून जात असतात, तसे थोडे मोठे डबे लावलेले असत. हायवेला लागून असलेल्या लहान गावाकडे जाण्यासाठी एक्झिट रोड्स होते. तिकडे जाणारी व्यक्ती योग्य वेळ साधून टोकाची लेन घेत असे. न्यू जर्सी प्रांतात प्रवेश करताकरता डेलावेअर नदी लागली. या नदीवरचा पूल प्रचंड मोठा आहे. आपल्या नागपूरचा ‘रामझूला’ खेळणं वाटावा इतका लहान ठरेल. ‘डेलावेअर मेमोरीअल ब्रिज’ हा सस्पेन्शन प्रकारचा जुळा पूल आहे. १९४९ साली हा पूल बांधायला प्रारंभ झाला होता. त्याची उंची १३४ मीटर इतकी आहे. लांबी एक मैल इतकी आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला तीन डॉलर इतका टोल द्यावा लागतो. तो भरण्याचे दोन प्रकार आहेत. एक आपल्या इथल्यासारखा आहे. दुसरा प्रकार असा आहे की, तुम्ही त्यासाठी वेगळा अकाउंट उघडून पैसे भरून ठेवायचे. असे केले की तुमच्या कारला एक डिव्हाइस लावण्यात येतो. तुम्ही टोल नाक्याजवळ आलात की, त्या ‘ई-झी पास’ अकाउंट मधून पैसे आपोआप वळते केले जातात आणि ‘थँक यू’ ची पाटी झळकते. कार थांबवावी लागत नाही की रांग लावावी लागत नाही.
अटलांटा सिटीमध्ये एका हॉटेलमध्ये एका सूट मध्ये थांबून चौपाटीवर जाण्यास निघालो. समुद्रकिनारा किती स्वच्छ असू शकतो याचे नमुनेदार उदाहरण समोर होते. तो तसाच राहण्यासाठी कशी आणि किती काळजी घेतली जाते, याचे प्रात्याक्षिकही पाहता आले. समुद्राचे पाणी स्वच्छ होते. ठिकठिकाणी मार्गदर्शक सज्ज होते. एक हेलिकॉप्टर उडत गेले. ते हवेतून देखरेख करीत होते. तेवढ्यात एक दुसरे हेलिकॉप्टर उडत गेले ते एक जाहिरातीचा पट पतंगासारखा सोबत घेऊन चालले होते.
डॉल्फिनच्या आठवणी
दुसऱ्या दिवशी डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्राच्या सफरीवर जायचे होते. साठ वर्षांपूर्वी डॉल्फिनचा अभ्यास केला होता. पण त्यातला फारच थोडा भाग लक्षात होता. कारण तो परीक्षेच्या निमित्ताने केलेला अभ्यास होता. आता त्याची प्रत्यक्ष भेट होणार होती. व्हेल माशाशी (देवमासा) नाते संबंध असलेला हा सस्तन प्राणी निवासासाठी पाण्यात ५५ लक्ष वर्षापूर्वी का गेला/जलवासी झाला, ते सांगणे विज्ञानाला कठीण आहे. कदाचित मानवाशी स्पर्धा नको म्हणून तो जलवासी झाला असावा, असे मला नेहमी वाटते. पण त्याला मानवाविषयी वाटणारी जवळीक पाहिली की ह्या आपल्या पूर्वजांच्या बांधवाविषयी कुतुह्लाबरोबरच आस्थाही जागी होते. बुडालेल्या जहाजातून वाचून समुद्रात कसाबसा जीव मुठीत धरून तरंगत राहणाऱ्या खलाशाची त्याने अनेकदा मदत केली आहे. अशाप्रकारे मदतीकडे डोळे लावून तरंगणाऱ्या खलाशांभोवती डॉल्फिन आपल्या भाईबंधांसह कोंडाळे करून पोहत राहतात आणि शार्क माशांना हुसकून लावतात, अशा कथा प्रचलित आहेत. त्यांचा मेंदू मोठा आणि विकसित असतो. डॉल्फिनला समुद्रात शत्रू खूप असतात. शार्क मासे तर त्यांचे सारखे लचके तोडत असतात. पण होणाऱ्या जखमा लगेचच भरून येतात. ही एक प्राणीशाशास्त्रालाही न उलगडणारी चमत्कारिक बाब आहे. असा प्रकार क्वचितच एखाद्या प्राण्यात आढळून येतो. असे असले तरी त्यांना ‘टाईप २ प्रकारचा मधुमेह’ मात्र होतो, असे शास्त्रीय अभ्यासात आढळून आले आहे. त्यांच्या स्वभावातील मानावाविषयीचे अतिरेकी माधुर्य तर याला कारणीभूत झाले नसेल ना? तीक्ष्ण दृष्टी, अतिशय तिखट कान, समोरच्या प्राण्याची केवळ चाहूलच नव्हे तर त्याच्या आकार आणि आकारमानाचीही (शेप अँड साईज) अचूक माहिती देणारे दात(दातांचा असाही उपयोग केला आहे या प्राण्याने) यांच्या भरवशावर हा आपला दूरदूरचा बांधव आपल्या बालगोपालांच्या लव्याजम्यासह आनंदानेच नव्हे तर गुण्यागोविंदाने लक्षावधी वर्षे वावरत आला आहे. तो आपल्यालाही एकदम जवळ जवळचा वाटायला लागतो. या आयुधांच्या भरवशावर हा पाण्यात मोठ्या दिमाखात वावरत असतो. नदीतील गढूळ पाण्यात त्याची दृष्टी जाते पण त्यामुळे याचे फारसे बिघडत नाही.
डॉल्फिनमधील बालसंगोपन
डॉल्फिन हा कळप करून राहणारा प्राणी आहे. या प्रकारातली काही बडी मंडळी मोठा जनाना बाळगूनही असलेले आढळतात. डॉल्फिनची मादी पिल्लाला जन्म देते तेव्हा तिच्या मैत्रिणी साह्याला, साथीला (कदाचित धीर द्यायलाही?) असतात. पुढे नंतरही सर्व प्रकारची मदत करतात. पिल्लाला आईचे त्वचेखाली दडलेले स्तन शोधण्याची आणि आपल्या मुखाची त्यावर पक्की पकड बसेल याची एवढीच काळजी घ्यावी लागते. असे न झाल्यास समुद्रातील खारे प्राणी आईच्या दुधात मिसळण्याची भीती असते हे ज्ञान त्याला उपजतच असते. पिल्लाच्या मुखात दूध सोडण्याचे काम मात्र आईच्या नियंत्रणात असते. यासाठी पिल्लाला काहीही कष्ट घ्यावे लागत नाहीत. श्वासोच्छवासासाठी पिल्लाला योग्य प्रकारे तरंगत ठेवण्याची जबाबदारी आईचीच असते. पिलू तीन वर्षांचे होईतो अंगावरचे दूध पीत असते.
डॉल्फिनचे प्रियाराधन
डॉल्फिन माणसाशी जवळीक ठेवण्याच्या आणि ती वाढवण्याच्या प्रयत्नात असतो. घोडा,कुत्रा असे अनेक प्राणी मानवावर जीवापाड प्रेम करतांना आपण पाहिले आणि ऐकले असतील. पण प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याने माणूस व प्राण्याचे प्रेम आजही दुर्मिळ मानले जाते. लोवाट नावाची एक महिला डॉल्फिनचा अभ्यास एका शास्त्रीय प्रयोगशाळेत करीत होती. आपल्यावर एका नर डॉल्फिनचे प्रेम बसले होते असा दावा तिने केला आहे. ती या डॉल्फिन सोबत राहत असे. ते दोघे एकत्र खात, पीत, खेळत, स्नान करीत असत. तिने त्याचे नाव पीटर असे ठेवले होते. लोवाटने त्याला इंग्रजी बोलण्यास शिकवले होते. पीटरशी आपले भावनिक संबंध जुळले होते, असे लोवाटचे म्हणणे आहे.
अशा या डॉल्फिनच्या जलप्रवासातील डौलदार हालचाली आम्ही पाहत होतो. कुणी डॉल्फिन आपल्या जनान्यासह पाण्यातून काहीसा बाहेर झेपावत आमच्या बोटीशी काटकोन करून वेगाने जात होता. त्यांची लगबग जाणवत होती. गल्फ स्ट्रीम हा उष्ण पाण्याचा समुद्रप्रवाह त्याची साथ देणार होता. अनेक माद्यांचे दिवस भरले असतील. त्यामुळे लगबग आवश्यकच होती. त्यातही आम्हाला फोटो काढता यावा म्हणून पोज देणाऱ्या त्या माद्याच असाव्यात, असे क्षणभर मनाला वाटून गेले.

No comments:
Post a Comment