माझी अमेरिका वारी
अमेरिकन धोबी
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
धोब्याचे दुकान (दुकान कसले एक मॉलच होता तो!) घरापासून ५ मैल अंतरावर होते. त्यामुळे घोब्याकडे ‘कपडे टाकणे’ हा कारमधून जाऊन पार पडायचा कार्यक्रमच असतो. या द्कानात गेल्यावर ४/५ खिडक्या दिसल्या. प्रत्येक खिडकीत एक कर्मचारी महिला होती. खिडकीपाशी एकावेळी एकाच गिऱ्हईकाने जावे असा नियम असल्यामुळे आम्ही आखलेल्या लक्ष्मण रेषेच्या पलीकडे आपला नंबर कधी लागतो याची वाट पाहत उभे राहिलो. खिडकी ‘रिकामी’ होताच मागे उभ्या असलेल्या कर्मचारी महिलेने सुहास्य वदनाने ‘हाय’ करून आम्हाला खिडकीजवळ येण्याची सूचना केली. आमचा मोबाईल क्रमांक आणि कपडे याची ‘गाठ’ बांधली.
दुसऱ्या दिवशी कपडे आणण्यासाठी गेलो आणि लक्ष्मण रेषेपलीकडे आपली वाट पाहत उभे राहिलो. खिडकी मोकळी होताच पुन्हा ‘हाय हाय’ झाले. आमचा मोबाईल क्रमांक घेऊन ती कर्मचारी महिला एका आडव्या पातळीत फिरणाऱ्या रहाटगाडग्याकडे गेली. तोपर्यंत ते रहाटगाडगे फिरायचे थांबले होते. मोबाईल नंबर फीड करताच ते रहाटगाडगे पुन्हा गतिशील झाले. प्रत्येक कपडा हँगरला लावलेला होता. एका गिऱ्हाईकाच्या कपड्यांचा एक वेगळा संच एकत्र असतो. असे संच फिरत फिरत थांबले. आमचा संच आला होता. तीन कपड्यांचे (फक्त!) आठ डॉलर झाले होते. कपडे घेऊन घरी आलो. माझ्या जाकिटाला एक नोट लावली होती. या जाकिटावरचे डाग पूर्णपणे काढता आले नव्हते आणखी प्रयत्न केला असता तर कापड फाटले असते म्हणून तसा प्रयत्न केला नाही, अशी ती नोट होती. माझ्या जाकिटावर आपल्या नागपुरातल्या डांबराचे आणि रिसेप्शन मधल्या तेलकट पदार्थांचे डाग पडले होते. ते अमेरिकन धोब्याला काय दाद देणार होते?असो.

No comments:
Post a Comment